Follow us

Home » ठळक बातम्या » महाबळेश्वर अर्बन बँक निवडणूक: 54% मतदान, दत्तात्रय वाडकर,राजेश कुंभारदरे  विजयी 

महाबळेश्वर अर्बन बँक निवडणूक: 54% मतदान, दत्तात्रय वाडकर,राजेश कुंभारदरे  विजयी 

महाबळेश्वर अर्बन बँक निवडणूक: 54% मतदान, दत्तात्रय वाडकर,राजेश कुंभारदरे  विजयी

महाबळेश्वर (सातारा): महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी असलेली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., महाबळेश्वर या बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत रविवारी मतदान पार पडलं. यात 54.04% सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.

सर्वसाधारण गटातून राजेश कुंभारदरे (2019 मते), दत्तात्रय वाडकर (1515 मते), शरद बावळेकर (1488 मते),सतिश ओंबळे(१४६०),समीर सुतार(१४१७),चंद्रकांत बावळेकर(१३३०),नदीम शारवान(१३२१),संपत जाधव(१२६५) यांसह सर्वसाधारण प्रवर्गातुन १५ पैकी 8 उमेदवार विजयी झाले. महिला राखीव गटातून मनीषा पारठे (1792 मते) आणि उषा ओंबळे (966 मते), इतर मागास प्रवर्ग राखीव गटातून जावेद वलगे (1912 मते), अनुसूचित जाती/जमाती राखीव प्रवर्गातून अनिल साळुंखे (897 मते) आणि विमुक्त जाती/भटक्या जमाती राखीव गटातून प्रशांत कात्रट (1665 मते) विजयी झाले.

विजयी उमेदवार आणि समर्थकांनी शहरात फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक सौ. अनुराधा पंडीतराव यांच्या मार्गदर्शनाखाली 73 कर्मचाऱ्यांनी 12 टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली. पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त होता. उर्दू शाळा क्र 3 मध्ये ही मतमोजणी झाली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्राचार्य सुनील कुमार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

प्राचार्य सुनील कुमार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा  सातारा, दि. २० : येथील पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्राचार्य सुनील कुमार

Live Cricket