यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये महाराष्ट्र दिन अभूतपूर्व उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांनी समाजाच्या हितासाठी प्रबोधनाचे कार्य करावे: भारत भोसले
यशोदा इन्स्टिट्यूट सातारा मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. . सकाळी ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीताने विद्यार्थ्यांची मन प्रफुल्लित झाली. महाराष्ट्रभर 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि जडणघडणीसाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांना वंदन करण्याच्या उद्देशाने यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून . राष्ट्रीय एकात्मता संघाचे अध्यक्ष भारत विजयसिंह भोसले हे उपस्थित होते. यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक दशरथ सगळे यांच्या हस्ते भारत भोसले यांना त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना श्री भारत भोसले म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी देखील माणुसकी जपणारी पिढी घडवण्यासाठी योगदान देणे गरजेचे बनले आहे. जाती-जातीमध्ये भेद होणे हे समाजाच्या हिताचे नाही तेव्हा जातिभेद टाळून नवीन पिढीला इतिहासाची खरी ओळख करून देणे गरजेचे बनले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना इतिहास विसरण्याचे किंवा ते पुसण्याचे कार्य काही लोकांच्याकडून घडत आहे. महाराष्ट्र भूमीचा ज्वलंत आणि जाज्वल इतिहास समाजासमोर आणणे गरजेचे बनले आहे. संकटाच्या छातीवर उभा राहून त्या संकटाची उंची कमी करण्याचे कार्य आपण केले पाहिजे. संवेदनशील मन समाजाची दिशा अधिक प्रगल्भ करू शकते असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे म्हणाले महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या आणि महाराष्ट्र राज्याचे नाव उंचावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आपण आदर करणे आवश्यक आहे. जबाबदार नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमांमध्ये यशोदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सिंधुताई सपकाळ माननीय व्यक्तींच्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. महाराष्ट्र राज्याच्या गौरव गीताने कार्यक्रमाला उंची प्राप्त झाली होती.
या कार्यक्रमासाठी श्री संजय शेलार ,यशोदा इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, संचालक डॉ. विवेककुमार रेदासनी, प्राचार्य डॉ. प्रवीणकुमार बडदापुरे, कुलसचिव गणेश सुरवसे, सह-संचालक प्रा. रणधीरसिंह मोहिते, प्राचार्य डॉ. विठ्ठल चावरे, प्राचार्य प्रवीण गावडे, यशोदा पब्लिक स्कूलचे प्राचार्य प्रदिश कलंगडंन, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने भारत भोसले यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला, यावेळी उपस्थित श्री संजय शेलार आणि इतर मान्यवर.