Follow us

Home » राज्य » महाबळेश्वरमध्ये भक्तीमय वातावरणात महाशिवरात्र उत्सव संपन्न

महाबळेश्वरमध्ये भक्तीमय वातावरणात महाशिवरात्र उत्सव संपन्न

महाबळेश्वरमध्ये भक्तीमय वातावरणात महाशिवरात्र उत्सव संपन्न

पार्वतीपूर पार: महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाल्याने महाबळेश्वर शहर भाविकांनी गजबजले होते.

महाबळेश्वर मंदिरात स्वयंभू महादेवाचे रुद्राक्ष रुपातील शिवलिंग आहे. शेकडो वर्षांपासून महाशिवरात्र उत्सव ग्रामस्थ आणि श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान न्यासाकडून परंपरागत पद्धतीने साजरा होत आहे.

यंदाच्या उत्सवात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर दर्शनासाठी महाबळेश्वरला आले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन तैनात होते.

अनिरुद्धज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट या सेवाभावी संस्थेकडून भाविकांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी 70 हून अधिक स्वयंसेवक उपस्थित होते. सह्याद्री ट्रेकर्स सर्च अँड रेस्क्यू टीमचे 10 जवानही आपली सेवा बजावत होते.

महाबळेश्वर नगरपालिकेद्वारे आपत्कालीन व्यवस्था पुरवण्यात आल्या होत्या. अग्निशामक आणि रुग्णवाहिका मंदिराच्या पार्किंगमध्ये तैनात होत्या.

विविध दानशूर व्यक्तींकडून केळी, लाडू आणि खिचडी यांसारखे उपवासाचे खाद्यपदार्थ भाविकांना वाटण्यात आले.

दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर शहरातील मरिपेठ येथील श्री महादेव मंदीर आणि तानुपटेल स्ट्रीट (गवळी मोहोल्ला) येथील चर्मकार समाजाचे शंकर पार्वती मंदीर येथे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.अशा रितीने मोठ्या भक्तीभावाने श्री क्षेत्र महाबळेश्वर आणि महाबळेश्वर शहरात महा शिवरात्र उत्सव भक्तीमय आणि उत्साहाने संपन्न करण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket