Follow us

Home » ठळक बातम्या » माहेश्वरी वाॅकेथान उपक्रमास साताऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

माहेश्वरी वाॅकेथान उपक्रमास साताऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

माहेश्वरी वाॅकेथान उपक्रमास साताऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.

दोनशेहून अधिक ज्येष्ठ स्त्री- पुरुषांच्या सहभागाने उपक्रम यशस्वी._

सातारा / प्रतिनिधी सातारा शहर माहेश्वरी सभा यांच्यातर्फे (कै.) माणिकलालजी श्रीकिसनजी कासट यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या समाजातील जेष्ठ नागरिकांसाठीच्या ‘माहेश्वरी वाॅकेथान’ या उपक्रमास साताऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठांबरोबरच विविध वयोगटातील 200 हून अधिक स्त्री-पुरुषांनी सहभाग घेत हा उपक्रम यशस्वी केला. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता वाॅकेथानची सुरुवात झाली. मात्र सहा वाजल्यापासूनच मोठ्या उत्सुकतेपोटी समाजबांधवांनी गर्दी केली होती. पूर्व नोंदणी केलेल्या सहभागी त्यांना पुरुषांसाठी टी-शर्ट तर महिलांसाठी जॅकेट व सर्वांनाच टोप्या भेट देण्यात आल्या होत्या. सर्वप्रथम भाविका मूथा यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागीतांचे वॉर्मअप व्यायाम घेण्यात आले. त्यानंतर श्रीमती शकुंतला कासट, माणिकलालजी मालपाणी यांनी झेंडा दाखवल्यावर वाॅकेथानची सुरुवात झाली. सुरुवातीला पुरुष मंडळी व त्यानंतर समाजातील महिला वाॅकेथानसाठी मार्गस्थ झाल्या. मारवाडी चौक – देवी चौक -कमानी हौद मार्गे नगरपालिकेपासून पुन्हा त्याच मार्गाने राजवाडा परिसरातील गोल बागेला वळसा घालून पुन्हा मारवाडी चौकात वाॅकेथानची सांगता झाली. तेथे या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार माहेश्वरी शहर सभा पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वेळोवेळी समाजबांधवांमध्ये आरोग्यविषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले. यावेळी महेश लोयांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी माहेश्वरी सभा जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. माहेश्वरी शहर सभेचे सहसचिव मनोज मर्दा यांनी प्रास्ताविक केले. सातारा माहेश्वरी शहर सभा अध्यक्ष मनिष लाहोटी यांनी आभार मानले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांनी मोठे परिश्रम घेत बहुमोल योगदान दिले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket