आमदार रोहित पवार यांनी ट्वीटरवर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. महाभारतातील प्रसंगाचे दाखले देत रोहित पवार यांनी राष्ट्रवादीतील परिस्थितीचे वर्णन केले आहे.
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्षाबाबत (EC On NCP) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar group) बाजूने निर्णय दिला असून शरद पवार गटाला (Sharad Pawar group) जोरदार धक्का दिला आहे. पक्षाचे नाव व चिन्ह हे अजित पवार गटाला मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. यावर शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी ट्वीटरवर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. महाभारतातील (Mahabharata) प्रसंगाचे दाखले देत रोहित पवार यांनी राष्ट्रवादीतील परिस्थितीचे वर्णन केले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे नाव व चिन्ह वापरण्याचा अधिकार अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार गटाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या या घटनेची तुलना महाभारतातील एका प्रसंगाशी केली असून आम्ही राजकीय कुरुक्षेत्रावर “महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि अहंकाराला गाडण्यासाठी लढतोय आणि शेवटी विजय आमचाच होणार!” असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
Published: February 7, 2024 04:53 PM Updated: February 7, 2024 04:53 PM