Follow us

Home » ठळक बातम्या » मुलांची सुसंस्कारीत पिढी हेच देशाचे भवितव्य- इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे

मुलांची सुसंस्कारीत पिढी हेच देशाचे भवितव्य- इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे

मुलांची सुसंस्कारीत पिढी हेच देशाचे भवितव्य इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे 

पारगाव येथे शुभचिंतन समारंभ

खंडाळा : शालेय विद्यार्थी हीच खरी देशाची संपत्ती आहे. शाळांमधून शिक्षणा बरोबर संस्कारक्षम मन घडविणे गरजेचे आहे. शिक्षकांसह मातापित्यांबद्दल मुलांच्या मनात आदर वाढणे आवश्यक आहे. मुलांचे आयुष्य घडावे यासाठी आईवडील काबाडकष्ट करतात तर शाळेत शिक्षक मेहनत घेतात याची जाणीव मुलांमध्ये कायम राहिली पाहिजे. मुलांची सुसंस्कारीत पिढी हेच देशाचे भवितव्य आहे असे मत इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांनी व्यक्त केले. 

        पारगाव ता. खंडाळा येथील उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शुभचिंतन समारंभात ‘ शालेय जीवन आणि संस्कार ‘ या विषयावर ते बोलत होते. यावेळी श्रीकृष्ण यादव , शैलजा जाधव , रत्ना खंडागळे , अंजुम पटेल , भारती काशीद , साधना भोसले , ताजुद्दीन मुल्ला , लक्ष्मी भंडलकर , संजय पांढरे यांसह प्रमुख उपस्थित होते. 

        दशरथ ननावरे म्हणाले , आई ही मुलांची पहिली गुरु आहे तर शाळा ही मुलांची दुसरी आई असते. शालेय वयात मुलांवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. केवळ संपत्तीचा मोह धरून जीवन जगणे योग्य नाही तर मुले हीच आपली संपत्ती मानून त्यांच्या घडण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे. मुलांनी आयुष्यात कितीही मोठे होऊ द्या मात्र आपल्या आई वडिलांना विसरता कामा नये. तुमचे जीवन घडावे यासाठी मातापिता काबाडकष्ट करतात. त्यांचे कष्ट सार्थकी लावणे हे मुलांचे कर्तव्य आहे. आई वडिलांचा आधार बनण्यासाठी कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद ठेवा. जीवनात संकटं आपणाला अडवायला येत नाहीत तर ती घडवायला येतात. संकटातून मार्ग काढला की यशाची दारे खुली होतात. मुलांनी विद्यार्थीदशेतच ध्येय निश्चित केले पाहिजे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उत्तुंग ध्येय समोर ठेवले पाहिजे. जिद्द , चिकाटी आणि प्रयत्नातील सातत्य कायम ठेवून त्या ध्येयाचा पाठलाग करायला हवा. जीवनात हमखास यश मिळवायचे असेल तर आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू 

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू  खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर

Live Cricket