मुलांनी स्पर्धा परीक्षेची कास धरावी : रविकांत बेलोशे
कळंबे महाराज पतसंस्थेच्या वतीने नव्या अधिकाऱ्यांचा सत्कार
हुमगाव , ता. ३ : जावळी व महाबळेश्वर तालुक्यातील यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेले अधिकारी तसेच इतर गुणवंतांचा काटवली येथील कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कर्तृत्वाचा गौरव सोहळा दापवडी येथील मुख्य कार्यालयात विवीध मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
यावेळी यूपीएससी , एमपीएससी परीक्षा तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या ओंकार पवार ( जिल्हाधिकारी),वैभव गोळे ( नगरपालिका प्रशासन),शेखर भिलारे(गटविकास अधिकारी),सूरज पाडळे (सहा. पोलीस उपनिरीक्षक), शुभम शिंदे (सहा.अभियंता वडूज),प्रणव गोळे (सहा.अभियंता महाबळेश्वर),प्रतीक राजपुरे (महाराष्ट्र पोलीस), सुहास भिलारे (महाराष्ट्र पोलीस),ओमकार गावडे (इंडीयन नेव्ही), संचित गावडे (इंडीयन आर्मी), सागर बेलोशे (सेवानिवृत्त आर्मी), सुधीर बेलोशे (सेवानिवृत्त आर्मी), निलेश बेलोशे (सेवानिवृत्त आर्मी), मानसिंग क्षीरसागर (सेवानिवृत्त आर्मी), सौ.शुभांगी पोफळे (लेखापरीक्षक) , कु.रोहिणी मांनकुमरे (कनिष्ठ सहा.जि प सातारा), सौ. कोमल पाटील(कनिष्ठ सहा. लिपिक), संजय जंगम (मंडलाधिकारी कराड),प्रतीक जाधव (तलाठी) कू.डॉ. तेजल शिंदे(आरोग्य), डॉ. समीर बेलोशे (आरोग्य), प्रवीण महाडीक (संगणक),सचिन रांजणे (सहकार), वीरेंद्र रांजणे(सहकार) या सर्व यशस्वी मान्यवरांचा हस्ते शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रविकांत बेलोशे, उपाध्यक्ष हरिश्चंद्र गावडे, ॲड. तुकाराम बेलोशे, नारायण जाधव, संचालक तुकाराम घाडगे, बाबुराव रांजणे, विजय रांजणे, शिवराम पवार, रामचंद्र चिकणे, मधुकर पवार , भीमराव खरात, रामचंद्र बेलोशे, व्यवस्थापक अनिल रांजणे, रमेश रांजणे, अशोक बेलोशे, रामदास रांजणे, दीपक पार्टे , बबनराव शिंदे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात रविकांत बेलोशे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलेआज मेहनतीशिवाय पर्याय नाही. स्पर्धा परीक्षेत आपली मुले गेली पाहिजेत. आपल्या विभागातील मुलांचे यश गगनाला भिडणारे असून त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढावा आणि त्यांचे यशातून इतरांनी प्रेरणा घ्यावी हा एकच उद्देश आमचा आहे. सर्वाँना संस्थेच्या वतीने शुभेच्छा.
या मुलांनी आपल्या घर, गाव आणि भागाचे नाव उंचावल्याचा आम्हाला गर्व वाटतो असे बाबुराव रांजणे यांनी सांगितले. आदरणीय कळंबे महाराजांच असे आपल्या भागातील अधिकारी व्हावेत हे स्वप्नं होते. परंतु ते पाहायला ते आज आपल्यात नाहीत याची खंत वाटते असे यावेळी तुकाराम घाडगे यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना सूरज पाडळे म्हणाले या सत्काराने आम्ही भारावलो असून अशीच समाजाची थाप गुणवंतांच्या पाठीशी राहिल्यास अनेक अधिकारी घडतील असे सांगितले.
सूत्रसंचालन गणेश पोफळे यांनी सूत्रसंचलन केले. प्रास्ताविक अनिल रांजणे यांनी केले तर हरिश्चंद्र गावडे यांनी आभार मानले.