Follow us

Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » मुंबईत तुफान पाऊसाचे थैमान 

मुंबईत तुफान पाऊसाचे थैमान 

मुंबईत तुफान पाऊसाचे थैमान

मुबईत तुफान पाऊस पडला आहे. सहा तासांमध्ये ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना पावसाचा फटका बसला आहेच. पण आमदार आणि मंत्रीही त्यातून सुटलेले नाही. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील रेल्वे ट्रॅकवरुन चालत निघाले. सकाळी पावणेदहाच्या दरम्यान या दोघांनीही चालत प्रवास सुरु केला. त्यानंतर पुढे उभी असलेली ट्रेन गाठली आणि त्यानंतर अधिवेशनात पोहचले. सामान्य नागरिकांप्रमाणेच मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना पावसाचा फटका बसला आहे.

काय म्हणाले आहेत अमोल मिटकरी

आम्ही दोनचार आमदार आणि मंत्री अनिल पाटील चालत निघालो आहोत. दादर आणि कुर्ला स्टेशनच्या मध्ये मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील मी, तसंच काही आमदार ट्रेनमध्ये अडकले आहेत. पावसामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा हा अंतिम आठवडा आहे त्यासाठी आम्ही जात आहोत. या अधिवेशनात जाताना आमचे हाल झाले आहेत. लवकरच वाहतूक पूर्ववत होईल अशी आशा आहे. सामान्य लोकांनाही याचा फटका बसला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket