Follow us

Home » राज्य » शिक्षण » नाईपर जे.ई.ई परीक्षेत गौरीशंकर लिंब फार्मसीची नेत्रदीपक कामगिरी

नाईपर जे.ई.ई परीक्षेत गौरीशंकर लिंब फार्मसीची नेत्रदीपक कामगिरी

नाईपर जे.ई.ई परीक्षेत गौरीशंकर लिंब फार्मसीची नेत्रदीपक कामगिरी..

14 विद्यार्थी चमकले, जिल्ह्यात सर्वाधिक उत्तीर्ण होण्याचा बहुमान, संस्थेच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा.

लिंब – दर्जात्मक व गुणात्मक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचे ज्ञानकेंद्र ठरलेले गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च गुवाहाटी (नाईपर) जे.ई.ई मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत दिनेश भरत सोनार, ऋतुजा अमृत मोहिते, प्रथमेश जयवंत मोरे, प्रणील तात्यासाहेब राऊत, शंतनू राजकुमार चकोते, संतोष दादासो ठोंबरे, दिशा राजाराम फरताडे, संध्या हेमंत जाधव, प्रियांका सुनील नाळे, आकांक्षा दिलीप सावंत, गोपाल नागनाथ डोईफोडे, सनीराज सखाराम भिंगारदिवे, स्वप्निल संजय जाधव, ओंकार भरत पाटील या विद्यार्थ्यांनी नेञदीपक कामगिरी करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचा नुकताच गौरीशंकर लिंब फार्मसी मध्ये संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ. योगेश गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की, गौरीशंकर लिंब फार्मसीच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी केलेल्या नेञदीपक कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी येथील प्राध्यापक घेत असलेल्या परिश्रमाला खऱ्या अर्थाने यश लाभले.

डॉ. योगेश गुरव म्हणाले कि, औषधनिर्माण शाखेतील स्पर्धात्मक स्पर्धेत येथील विद्यार्थी सामोरे ते यशस्वी होतात. त्यांच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालय स्तरावर करण्यात येणारे मार्गदर्शन त्यांच्या उज्वल करण्यासाठी पूरक ठरते.

 यावेळी जी पॅट सेलचे प्रमुख डॉ.स्फूर्ती साखरे, विभागप्रमुख डॉ. संतोष बेल्हेकर, ङाॅ.भूषण पवार, डॉ धैर्यशील घाडगे, प्रा. माधुरी मोहीते, प्रबंधक निलेश पाटील आदि प्रमुख उपस्थित होते.

राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध परीक्षेत येथील महाविद्यालयाचे विद्यार्थी नेहमीच चमकदार कामगिरी करून महाविद्यालयाचा नावलौकिक उंचवत असतात. येथील तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन बरोबरच सुसज्य ग्रंथालय, अद्ययावत लॅब, स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ विद्यार्थ्यांना प्राप्त होत असल्याने येथील विद्यार्थी दरवर्षी विविध स्तरावर होणाऱ्या परीक्षेत यशस्वी होत आहेत. औषधनिर्माण शास्त्र शाखेत नाईपर जे.ई.ई परीक्षा ही सर्वात प्रतिष्ठेची समजली जाते. उज्वल करिअरच्या दृष्टीने या परीक्षेत उत्तीर्ण होणे महत्त्वपूर्ण मानले जाते या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या नाईपर इन्स्टिट्यूट मध्ये एम फार्मसी, एम एस (फार्म), एम टेक साठी प्रवेश मिळतो. औषधनिर्माण शास्त्र शाखेतील बदलती आव्हाने व त्यास पूरक ज्ञान कौशल्ये वाढीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च ही संस्था दरवर्षी परीक्षा घेते. औषधनिर्माण क्षेत्रात उज्वल भवितव्य घडवणार्याष या परीक्षेत देशभरातून लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात त्यात काही हजारातच विद्यार्थी उत्तीर्ण होतात.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप, प्रशासकीय अधिकारी नितीन मुङलगीकर यांनी अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संजय देशमाने यांनी मानले.

चौकट – नाईपर जे.ई.ई. परीक्षेत जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा बहुमान गौरीशंकरला प्राप्त…

 नाईपर जे.ई.ई परीक्षेत गौरीशंकर लिंब फार्मसी व सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेञदीपक कामगिरी प्राप्त केली आहे. गौरीशंकरचे जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत लिंब फार्मसीचे 14 व देगाव फार्मसी चे 12 असे एकूण 26 विद्यार्थी या परीक्षेत चमकले आहेत. दर्जात्मक व गुणात्मक शिक्षणाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे. या विद्यार्थ्यांचे सर्वस्तरावर कौतुक होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket