यशोदा इन्स्टिट्यूट चे कुलसचिव गणेश सुरवसे यांचा महाराष्ट्र सन्मान पुरस्काराने गौरव
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पसचे कुलसचिव गणेश सुरवसे यांना ‘महाराष्ट्र सन्मान 2024’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा सातारा येथे पार पडला.
गणेश सुरवसे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘महाराष्ट्र सन्मान 2024’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राजीव उपाध्यक्ष सतीश सावंत आणि पुणे स्थित प्रसिद्ध उद्योजक अमोल पाटील हे प्रमुख उपस्थित होते.
या पुरस्कार संपादनाबद्दल यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक दशरथ सगरे , उपाध्यक्ष प्राध्यापक अजिंक्य सगरे,कार्यकारी संचालिका नम्रता सगरे , संचालक डॉ. विवेककुमार रेदासनी, प्राचार्य डॉ. प्रवीणकुमार बडदापुरे, सहसंचालक तसेच इतर महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.