पुसेगाव : सोमवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी खटाव येथे झालेल्या तालुका स्तरीय १७ वर्ष वयोगटाखालील बुद्धीबळ स्पर्धे मध्ये डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मिडियम स्कूल पुसेगांव इयत्ता ९ वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी ओम आनंद पवार याची जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली.
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगांव मा. संस्था अध्यक्ष डॉ. सुरेशरावजी जाधव साहेब, मा. उपसंस्थापक श्री बाळासाहेब जाधव, संस्था सचिव मा. श्री मोहनराव जाधव पाटील, संस्थेचे खजिनदार मा.श्री लक्ष्मणराव जाधव , विश्वस्त मा . श्री विश्वनाथराव जाधव, मा.विश्वस्त श्री योगेशराव देशमुख साहेब, मा. विश्वस्त श्री एस.आर.पाटील सर मा.संस्था सदस्य श्री जयंतराव जाधव सर, एस.आर.पाटील सर, प्रशासकीय अधिकारी मा. श्री डी.पी. शिंदे सर व मुख्याध्यापिका सौ देशमुख मॅडम , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून ओम आनंद पवार यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.डॉ.राधाकृष्णन इंग्लिश मिडियम स्कूल पुसेगांव मधील विद्यार्थ्यांना खेळाबाबत मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून दिल्या जातात.