Follow us

Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » हिलदारी अभियाना अंतर्गत महाबळेश्वर क्लस्टर मध्ये पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

हिलदारी अभियाना अंतर्गत महाबळेश्वर क्लस्टर मध्ये पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

हिलदारी अभियाना अंतर्गत महाबळेश्वर क्लस्टर मध्ये पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

पर्यावरण संवर्धन व जनजागृती यासाठी दरवर्षी जगभरात विविध प्रकारे प्रयत्न केले जातात.यासाठी प्रत्येक वर्षी, एक वेगळी थीम निवडली जाते, जी हवामान बदल, ग्लोबल वार्मिंग आणि जंगलतोड यासारख्या समस्यांवर प्रकाश टाकून त्याबाबत लोकांना काम करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यावर्षी २०२४ ला जागतिक पर्यावरण दिनाची थीम – जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोधकता अशी होती. यूएन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेजर्टिफिकेशन नुसार पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी ४० टक्क्यांपर्यंत जमीन खराब झाली आहे, ज्याचा थेट परिणाम जगातील निम्म्या लोकसंख्येवर होवू शकतो. सन २००० पासून दुष्काळाची संख्या आणि कालावधी २९ टक्क्यांनी वाढला असून यावर तातडीने उपाययोजना न केल्यास सन २०५० पर्यंत जगातील तीन चतुर्थांश लोकसंख्येवर याचा परिणाम होऊ शकतो. 

याच अनुषंगाने हिलदारी मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात वाई येथील कचरा वेचकांपैकी ०५ लोकांना मतदान कार्ड, ०५ लोकांना आयुष्मान भारत अंतर्गत पाच लाखापर्यंत मोफत उपचार , ०९ लोकांचे इ श्रम अंतर्गत नोंदणी व ०२ कचरा वेचकांचे रेशन कार्ड अंतर्गत नोंदणी करून प्रांताधिकारी श्री राजेंद्र जाधव यांच्या हस्ते या सर्व योजनांचे वितरण वाई येथील प्रांताधिकारी कार्यालयात करण्यात आले. 

तसेच आपले महाबळेश्वर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सतत राबणाऱ्या व शहराच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर गिरीस्थान हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सातारा येथील माऊली हॉस्पिटल व रिसर्च सेंटर आणि ओन्को लाईफ कॅन्सर सेंटर यांचे सहकार्य लाभले असून नगरपालिका व वन विभाग यांच्या एकूण १२० स्वच्छता कर्मचारी यांनी याचा लाभ घेतला.

महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत हिलदारी च्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नगरपालिका व क्लस्टर मधील एकूण ०८ शाळांच्या २४७ विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत सहभाग नोंदविला असून मिनी काश्मीर – महाबळेश्वर, कचरा लाख मोलाचा, दुष्काळ – मानव निर्मित/निसर्गनिर्मित, स्वच्छ सुंदर हरित महाबळेश्वर आणि पर्यावरण पूरक जीवनशैली इत्यादी विषयांवर सुंदर असे चित्र काढले. यात सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागाबाबत मेडल देण्यात आले असून महाबळेश्वर व क्लस्टर या दोन गटांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमाकांचे बक्षिसे देण्यात येणार आहे.

तसेच वन विभाग महाबळेश्वर यांच्या सहकार्याने व नगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत अंजुमन हायस्कूल, न.पा. उर्दू शाळा क्र.३ व शेठ गंगाधर माखरीया हायस्कूल येथे जांभूळ व पेरू ची झाड लावण्यात आली. सदर वृक्षारोपण उपक्रमात हिलदारी टीम समवेत शाळेचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

या सर्व उपक्रमात महाबळेश्वर चे गिरीस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री योगेश पाटील, वनक्षेत्रपाल श्री गणेश महांगडे, मुख्य लिपिक श्री आबाजी ढोबळे, स्वच्छता निरीक्षक श्री अहमद नालबंद, मनोज चव्हाण, वैभव साळुंखे, आकाश चव्हाण,गिरीस्थान हायस्कूल, अंजुमन हायस्कूल, न.पा. उर्दू शाळा क्र.३, शेठ गंगाधर माखरीया हायस्कूल, एम. इ.एस. हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, मेटगुताड, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, नाकिंदा, जिल्हा परिषद शाळा, क्षेत्र महाबळेश्वर इत्यादींचे मुख्याधापक, ग्रामपंचायत मेटगुताड, नाकिंदा व क्षेत्र महाबळेश्वर चे सरपंच व ग्रामसेवक, वन विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांचे सहकार्य लाभले असून हिलदारी टीम चे डॉ मुकेश कुळकर्णी, राम भोसले, अश्विनी राउत, प्रतिमा बोडरे, अनुराग खरे, अमृता जाधव, गौरी चव्हाण, खाक्सरली पटेल व स्वाती सकपाळ यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket