Follow us

Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » लोणंद मधील रेल्वेच्या उड्डाणपूलास( ओव्हर ब्रिज ) लोणंदच्या नागरिकांचा विरोध

लोणंद मधील रेल्वेच्या उड्डाणपूलास( ओव्हर ब्रिज ) लोणंदच्या नागरिकांचा विरोध

लोणंद मधील रेल्वेच्या उड्डाणपूलास( ओव्हर ब्रिज ) लोणंदच्या नागरिकांचा विरोध

लोणंद मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड आणि नगराध्यक्ष सीमा खरात यांना दिले निवेदन

लोणंद प्रतिनिधी (राहिद सय्यद )-दि.२०/०९/२०२३ रोजीच्या ठराव क्र.५८ अ नुसार नगरपंचायतने मौजे लोणंद हद्‌दीतील रेल्वे फाटक क. ४० रेलो कि.मी.३२/५-६ वर उड्डानपुल करण्याबाबत करण्याबाबत या ठरावानुसार ना हरकत दिलेली आहे तरी या प्रस्तावित उड्डाण पुलामुळे सातारा पुणे रोडच्या दुतर्फा असलेली कायदेशीर बांधकाम परवाना असलेली व नियमाप्रमाणे कराची पावती भरणाऱ्या व्यावसायिक इमारतीचे नुकसान होणार आहे तरी या रोडच्या दोन्ही बाजूंना सात दवाखाने आहेत या उड्डाणपुलामुळे दवाखान्याच्या इमारतीचे व लोणंदच्या व्यापारी पेठेचे मोठे नुकसान होईल सईबाई हाऊसिंग सोसायटी मध्ये जड वाहनांची वाहतूक नसते पादचारी मार्ग व हलक्या वाहनांसाठी सदर ठरावात भुयारी मार्ग प्रस्तावित आहे त्याप्रमाणे भुयारी मार्ग करावा तसेच लोणंदच्या व्यापार पेठेला व व्यापाऱ्यांना हानिकारक होईल असा कोणताही उड्डाणपूल करू नये अशी आमची मागणी आहे असे निवेदन लोणंद ग्रामस्थांनी लोणंद नगरपंचायत मुख्य अधिकारी दत्तात्रय गायकवाड आणि लोणंद नगराध्यक्ष सीमा वैभव खरात यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यावेळी नगरसेविका रशिदा इनामदार, तृप्ती घाडगे, सुप्रिया शेळके, नगरसेवक गणीभाई कच्ची, शिवाजीराव शेळके, असगर इनामदार , अॅs गणेश शेळके राहुल घाडगे ,डॉक्टर दीपक गोरड, जावेद पटेल ,अमोल ठोंबरे, महेंद्र यादव सौळसकर, मुस्तफा लोणंदवाला , शफीभाई मुलाणी उदय धामणकर शकील इनामदार वैभव व्होरा प्रशात व्होरा समीर इनामदार राहुल शहा संजय भांड सामाजिक कार्यकर्ते वसंत काका पेठकर, परेश व्होरा ,आशिष व्होरा, तेजस सिरसागर ,दिपक साळूखे ,सचिन अमित घाडगे गुडगे सिकंदर कच्ची आदी मान्यवर उपस्थित होते

लोणंद नगरपंचायतीचे एकूण १७ प्रभाग आहेत. यापैकी प्रभाग क्र.२.३.४.११.१६,१७ हे सहा प्रभाग रेल्वे चे पूर्व बाजूम स्थित आहेत. या ठिकाणी मा.शरदचंद्र पवार महाविद्यालय , न्यू इंग्लिश स्कूल मुलींचे व ज्युनियर कॉलेज, मालोजीराजे विद्यालय व ज्युनियर कॉलेज, पोलीस स्टेशन कृषी उत्पन बाजार समिती, खरेदी विक्री संघ ,आय टी आय, मंगल कार्यालय अशा अनेक शैक्षणिक संस्था तसेच शेतकरी वर्गाशी निगडीत संस्था सातारा पुणे रेल्वे पूर्व बाजूस आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून जाणे येणेकरीता हजारो विद्यार्थी व नागरिक रोज ये जा करीत असतात त्यामुळे रेल्वे गेटचे जागी भुयारी मार्ग व्हावा असा पत्रव्यवहार रेल्वेच्या अधिकारी वर्गा शी केला आहे

सौ सिमा वैभव खरात नगराध्यक्ष लोणंद

रेल्वे मार्गावर ज्या ठिकाणी रेल्वे गेट आहेत त्या तिथे अंडरपास होणे गरजेचे आहे त्याप्रमाणे प्रशासनाने निर्णय घ्यावे कोणत्याही प्रकारचा व्यापाऱ्यांचे उद्योगधंद्यांचे नुकसान होईल असे करू नये सर्व बाबी लक्षात घेऊन विकास कामे करण्यात यावी

राहूल घाडगे संचालक किसनवीर साखर कारखाना भुईंज

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket