शहरातील अवैध धंदे करणारे लोक रडारवर आले आहेत. पुणे पोलिसांनी दुसऱ्या दिवशी देखील परेड करत अवैध धंदे करणारे आणि बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांची हजेरी घेतली आहे.
पुणे : पुण्याचे नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) हे एक्शन मोडमध्ये आले आहेत. आल्यानंतर त्यांनी लगेचच पुण्यातील कुख्यात गुंडांना एकसाथ आयुक्तालयामध्ये बोलावले. ऑन रेकॉर्ड असणाऱ्या या गुंडांची परेड आयुक्तांनी घेतल्यानंतर आता शहरातील अवैध धंदे करणारे लोक रडारवर आले (Illegal business Parade) आहेत. पुणे पोलिसांनी (Pune Police) दुसऱ्या दिवशी देखील परेड करत अवैध धंदे करणारे आणि बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांची हजेरी घेतली आहे.
पुणे शहरामध्ये अवैध धंदे करणारे आणि बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगणाऱ्या लोकांची परेड घेण्यात आली आहे. गांजा, ड्रग्ज बाळगणाऱ्या ऑन रेकॉर्डवरील 500 हून अधिक गुन्हेगारांची पुणे पोलिस आयुक्तालयामध्ये ओळख परेड घेण्यात आली. शहरातील 30 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अमली पदार्थ विक्रेते, गांजा विक्रेते यांना बोलावून घेण्यात आले. त्यांना गांजा विक्री बंद म्हणजे बंद अशा शब्दांमध्ये पुणे पोलिसांनी तंबी दिली.