Follow us

Home » गुन्हा » पुणे सातारा महामार्गावर एसटी बस पेटली एक जण जळून खाक

पुणे सातारा महामार्गावर एसटी बस पेटली एक जण जळून खाक

पुणे सातारा महामार्गावर एसटी बस पेटली एक जण जळून खाक

वाई प्रतिनिधी शुभम कोदे:पुणे सातारा महामार्गावर बुधवारी दि. 14 रोजी भुईंज नजीक असणाऱ्या हॉटेल विरंगुळा समोर एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातामध्ये एक जण जळून खाक झाला. एसटी मधील प्रवाशी सुदैवाने बचावले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पुणेहून सातारा बाजुकडे जाणारी दुचाकीला पुढील अज्ञात कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी चालकाला एस. टी. बस त्र्यंबकेश्वर ते पलूस जाणारे बसने  ने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकासह दुचाकीने पेट घेतला व त्याचवेळी एस टी बस हि पेटली प्रसंगावधान राखत मदतकार्य करणा- यांनी एस. टी. बसमधील प्रवाशी यांना सुखरूप बाहेर काढले त्या दरम्यान एस. टी. बस खाली असलेली दुचाकी चालकासह दुचाकी पेटतच होती. त्यातच दुचाकी चालकाचा होरपळून मृत्यू झाला.

घटनास्थळी भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे फौजफाटा घेवून पोहचले. किसनवीर कारखान्याचे आणि वाई नगरपालिकेचे आग्नीशामक यंत्रणा यांनी मदतकार्य करून आग आटोक्यात आणली. या दरम्यान सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातातील पेटलेली दुचाकी व दुचाकी चालकाची ओळख पटवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत चालू होते. दरम्यान पोलीसांनी जळून खाक झालेल्या मोटार सायकलच्या चेस नंबर वरून माहिती घेतली असता ती गाडी यामाहा कंपनीची असुन ती स्वप्नील शरद डुबल रा. वडवली ता. कराड जि. सातारा यांचे नावावर असल्याचे आर टी ओ अॅपवरून समजत असल्याची माहिती मिळत आहे.

पेटलेल्या एस. टी. बसमध्ये अनेक प्रवाशांचे साहित्य जळून खाक झाले यातच नुकतीच पोलीस भरतीला गेलेल्या एका युवतीचे कागदपत्रासह बॅग जळाल्याने तिचे घटनास्थळी आक्रोश अनेकांची मने हेलावून टाकणारा होता

 महामर्गावर वाढत्या आगीच्या घटना लक्षात घेवून जिल्हा प्रशासन व महामार्ग प्राधिकरण अग्निशामक दल यंत्रणा कार्यान्वित करणार आहे की नाही?

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू 

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू  खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर

Live Cricket