मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात काल मोठा निर्णय झाला, त्याचे पडसाद राज्यभर उमटल्याचे आज पाहिले गेले. काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीबाबतचा मोठा निर्णय देत, शरद पवार गटाला मोठा दणका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणी (NCP MLA disqualification case) मेरिटनुसारच निकाल दिला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणी (NCP MLA disqualification case) मेरिटनुसारच निकाल दिला जाईल. निवडणूक आयोगाने (Election Commission of India) दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सांगितलं. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भावनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले. निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत आता राष्ट्रवादीचे कोणते आमदार पात्र आणि अपात्र होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मेरिटनुसारच निकाल –
राष्ट्रवादी आमदार अपात्रप्रकरणी मेरिटनुसारच निकाल दिला जाणार आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही सबंध या निकालाशी जोडला जाणार नाही. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भावनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.