स्पष्टवक्ते, आक्रमक अन् लोकांमध्ये मिसळणारे श्रीमंत छत्रपती उदयनराजे
सर्वसामान्य लोकांनाही श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपलेसे वाटतात.भावनिक स्वभाव असल्याने लोकांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. स्पष्टवक्तेपणा, आक्रमकपणा व साधी राहणी तसेच सर्वसामान्य जनतेची बाजू घेण्याकडे त्यांचा कल असल्याने त्यांना जनतेचा मोठा पाठींबा असतो.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये राजकीय लोकांच्या भेटीगाठी लग्न , समारंभ, राजकीय भेटी यामध्ये व्यस्त आहेत. श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले हे सध्या राजकीय दौऱ्यासाठी सकाळी ७:३० वाजताच जलमंदिर सोडतात. दिवसभर ते जिल्ह्याच्या विविध भागांत फिरत आहेत.
उदयनराजेंची राजकीय कारकीर्द नगरसेवक पदापासून सुरू झाली. 1991 मध्ये ते सातारा पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी आपल्या खासदारकीच्या कालावधीत अनेक मोठे प्रोजेक्ट साताऱ्यात आणून सातारा जिल्ह्याचा विकास घडवून आणला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आयटी कंपन्या आणण्यासाठीही खासदार उदयनराजेंनी विशेष प्रयत्न केलेले आहेत.सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क असून त्यांचे कार्यकर्ते सर्व तालुक्यांत आहेत.
त्यांची कॉलर उडवण्याची स्टाइल तरुणाईला भुरळ घालते. त्यांच्यासाोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणाईची झुंबड उडते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ग्राउंड लेव्हल ला मोठ्या प्रमाणात वेळ दिला असल्याचे त्यांच्या झंजावती दौऱ्यांनी दिसून येत आहे.