Follow us

Home » ठळक बातम्या » रामनगर ते लिंबखिंङ रस्त्याचे झाले रुंदीकरण

रामनगर ते लिंबखिंङ रस्त्याचे झाले रुंदीकरण

रामनगर ते लिंबखिंङ रस्त्याचे झाले रुंदीकरण….

 वाहन चालक व नागरिकांकडून समाधान व्यक्त, ग्रामस्थांकडून प्रशासनाचे कौतुक

लिंब – सातारा जिल्ह्यात रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण पाहता रस्ता वाहतूक सुरक्षितता हा गंभीर प्रश्न सध्या प्रशासनाच्या ऐरणीवर आला आहे. सुरक्षित वाहतूक व सुरक्षित प्रवासासाठी प्रामुख्याने रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे अरुंद रस्ते हे वाहतूक कोंडी व अपघाताला कारणीभूत ठरतात याबाबत प्रशासन नेहमीच उपाययोजना करीत असतात सातारा पुणे जुना हायवे महामार्गावर रामनगर ते लिंबखिंङ पर्यंत रस्ता वरून वाहन चालकांना वाहतूक करणे कठीण जात होते अनेकदा या मार्गावर अपघाताचे घटना घडल्या आहेत सध्या या रस्त्याचे रुंदीकरण सुरू झाल्याने वाहतूक चालकांमधून समाधान व्यक्त होत आहे या मार्गावरून वाहतूक करणे आता सुलभ व सुखकर झाले आहे चौकट – लिंबखिंडीतून सातारा शहराकडे प्रवास करताना लिंब खिंड ते रामनगर पर्यंतचा अरुंद असलेला रस्ता वाहनासाठी खूपच धोकादायक ठरत होता वळणदार मार्गाचे रुंदीकरण व्हावे यासाठी वाहनचालक व ग्रामस्थांची मागणी होती या मार्गावरून वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच या परिसरातील वाढलेल्या शिक्षण संस्था व मंगल कार्यालयमुळे नागरिक व विद्यार्थ्यांचा अधिक वावर असतो.

रामनगर ते लिंबखिंड महामार्गावरील मुख्य रस्ता लगतच्या साईड पट्ट्या खचल्याने वाहन चालकांची वाहने घसरून या ठिकाणी अपघाताची घटना घडत होत्या अनेकदा या मार्गावर घडलेल्या अपघातात मनुष्यहानी झाली आहे विशेषतः रात्रीच्या वेळी या परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्याने रस्त्यालगतच्या भागाचा अंदाज वाहन चालकाला येत नसल्याने या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले होते प्रशासनाची याची दखल घेऊन या रस्त्याचे रुंदीकरण केल्याने अपघात ग्रस्त महामार्ग सुरक्षित प्रवासासाठी सुकर झाला आहे नागरिक व वाहन चालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

– वाहनचालक व प्रवासांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत अरुंद रस्त्याचे केलेले रुंदीकरणाबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन या मार्गावरून प्रवास करताना आता प्रवासी व नागरिकांना सुखकर वाटत असून यामार्गवर होणार्‍या अपघातांच्या संख्येना आता आळा बसेल-

श्रीरंग काटेकर सातारा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket