रयत माऊलींची ९४ वी पुण्यतिथी
सातारा -प्रतिनिधी: रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या ९४ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.सोमवार दि.८ एप्रिल रोजी दुपारी ३:३० वा. श्री शाहू बोर्डिंग हाऊस तथा धनिणीची बाग सातारा येथे होणार आहे. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी ऑडिटर प्राचार्य विश्वासराव काळे तर संघटक डॉ.अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राहणार असल्याचे सचिव विकास देशमुख (माजी सनदी अधिकारी) यांनी माहिती दिली.