Follow us

Home » ठळक बातम्या » आरोग्य » रोबोटिक सर्जरी सर्जन डॉक्टर सौरभ गिरी यांचे बुधवारी मोफत गुडघा व खुबे वेदना तपासणी शिबिर

रोबोटिक सर्जरी सर्जन डॉक्टर सौरभ गिरी यांचे बुधवारी मोफत गुडघा व खुबे वेदना तपासणी शिबिर

सातारा प्रतिनिधी -सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर, एम.डी. शिंदे चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट व हेलिओस ऑर्थोजॉइंटचे डॉ. सौरभ गिरी (एम. एस. ऑर्थोपडिक सर्जन) (गोल्ड मेडलिस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत मोफत गुडघा व खुबे वेदना तपासणी शिबिर सातारा डायग्नोस्टिक सेंटर, सातारा येथे आयोजित केले आहे.

खुबे आणि गुडघे तपासणी व सल्ला शिबिरात सवलतीच्या दरात स्क्रिनिंग केले जाणार आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर किमान वेदना, कमी रक्तस्राव, कमीत कमी हाडांचे नुकसान, सांध्यांचे उत्तम सरेखन, तंतोतंत अचूकता सांध्याचे आयुष्य वाढते.

शस्त्रक्रियेनंतर काही तासात चालता येते व जलद रिकव्हरी होत असल्याने या तपासणी शिबिराचा लाभ ज्येष्ठ नागरिक व गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन रोबोटिक सर्जरीमध्ये निष्णात असलेले डॉ. सौरभ गिरी यांनी केले आहे. या मोफत शिबिराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी सातारा डायग्नोस्टिक सेंटर, देवी कॉलनी, सदरबझार, सातारा संपर्क साधावा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket