सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेस रु. ४ कोटी ४० लाखाचा निव्वळ नफा
सहकार क्षेत्रात सक्षम व आदर्श पतसंस्था म्हणून मा. राज्यपाल यांचे हस्ते “सहकार भूषण” पुरस्कार देवून गौरविलेल्या धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रु. २६५ कोटीचा व्यवसाय केला आहे. पारदर्शक कारभाराच्या जोरावर सन २०२३-२०२४ मध्ये ढोबळ नफा रु. ५ कोटी ०८ लाख मिळविला असून सर्व कायदेशीर तरतुदी पूर्ण करून रु ०४ कोटी ४० लाख इतका निव्वळ नफा मिळविला आहे.
धन्वंतरी पतसंस्थेने आपल्या नियोजनबध्द कामकाजामुळे गतवर्षीच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा जास्त नफा मिळविला आहे. सर्व सभासद, कर्जदार, ग्राहक, संचालक, सेवक यांचे सहकार्याने हे यश संपादन केले असल्याचे संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की, सेवकांनी व संचालकांनी ग्राहकांकडे प्रत्यक्ष भेटी देवून, फोनव्दारे सतत संपर्क ठेवला. ग्राहकांचेसुध्दा धन्वंतरीवर मनापासून प्रेम असलेमुळे काही कर्जदारांनी स्वयंप्रेरणेने कर्जखाती नियमित केली अशा सर्व कर्जदारांचा आम्हांला अभिमान वाटतो त्यांचे सर्वप्रथम मी संचालक मंडळाचे वतीने अभिनंदन करुन आभार मानतो तसेच व्हा. चेअरमन डॉ. शिरीष भोईटे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार व त्यांचे सर्व सहकारी अधिकारी वर्ग या सर्वांच्या प्रयत्नामुळे परिणामकारक कर्जवसुली झाली त्याबददल त्यांचे विशेष अभिनंदन करतो.
संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना ते म्हणाले की, संस्था आपले कामकाज सहकार कायदा, नियम व मंजुर उपविधीमधील तरतूदीनुसार करत आहे. सहकार खात्यांचे सर्व निकष, मानांकने इ. ची पूर्तता संस्था प्रत्येक वर्षी करतेच. यावर्षीसुध्दा ऑडीट गुणतक्त्यातील निकषांची पूर्तता संस्थेने पूर्ण केली असून शासकीय लेखापरीक्षणानंतर संस्थेस सर्वोच्च असा ऑडीट वर्ग ‘अ’ निश्चितच मिळेल. संस्थेचे संचालक मंडळाने व्यावसायिक व्यवस्थापनाचे धोरण समोर ठेवून वेळोवेळी प्रभावीपणे निर्णय घेतले तसेच सर्व संचालक व कर्मचारी यांना वेळोवेळी प्रशिक्षण देउन संस्थेचा कारभार नियोजनबध्द करुन संस्थेची प्रतिमा समाजात उंचावली आहे. विशेष बाब म्हणजे संस्थेने या आर्थिक वर्षात रू. ३७ कोटी इतक्या रकमेचे सोने तारण कर्जवाटप केले आहे. संचालक मंडळाने बाजारपेठेतील मानसिकता व ग्राहकाभिमुख तसेच व्यवसायिक दृष्टीकोन समोर ठेवून नगर वाचनालय तांदुळ आळी सातारा येथे सोने तारण कर्ज विभाग व सभासद संपर्क कार्यालय कार्यान्वित केले आहे. तसेच संस्थेच्या मुख्य कार्यालयासह शाखा संपूर्ण संगणकीकरणासह स्वमालकीच्या वास्तूत कार्यरत आहेत. सभासद, ठेवीदार, कर्जदार, कष्टाळू सेवक यांचे सहकार्यानेच आपणांला हे यश प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले व याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले व आभार व्यक्त केले. तसेच संस्थेने सभासदांकरीता गृहबांधणी, सोने तारण व वाहन खरेदी कर्ज योजनेस ८.७५% व इतर कर्ज योजनेकरीता ११% इतका अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करत आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
व्हा. चेअरमन डॉ. शिरीष भोईटे म्हणाले की, ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेच्या ठेवी रु १५६ कोटी ७० लाख इतक्या आहेत तसेच संस्थेने कर्जपुरवठा रु. १०६ कोटी ८६ लाख केला असून रु. १०३ कोटीची सुरक्षीत गुंतवणूक केली आहे. संस्थेचे स्वनिधी रु. ३९ कोटी ९५ लाख व खेळते भांडवल रु. २२१ कोटी ०९ लाख इतके झाले असल्याचे त्यांनी सांगीतले. हे यश मिळवून देण्यास सहकार्य केल्याबदद्ल सर्व सहकारी संचालकांचे व सेवक वर्गाचे त्यांनी अभिनंदन करून आभार मानले. कृती आराखड्यानुसार कामकाज करुन आवश्यक तेवढाच खर्च करुन काटकसरीचे धोरण राबविल्यामुळे व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण फक्त १.३०% इतके अत्यल्प राखले आहे. स्थापनेपासून अ वर्ग, प्रतिवर्षी लाभांश अशा अनेक बाबीमुळे लोकांचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ होत आहे. तसेच संस्थेने सीबीएस संगणक प्रणाली कार्यान्वित केल्यामुळे ग्राहक एसएमएस बँकीग, नेट बँकीग, एन.इ.एफ.टी. व आर.टी.जी.एस. सारख्या अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेत आहेत याचे समाधान वाटते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय यादवराव पवार यांनी पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन मा. संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाने अचूक तयार करुन सर्व सेवकांचे सहकार्याने ते परीणामकारक राबविणार असल्याचे सांगून आभार मानले. याप्रसंगी संचालक डॉ. अरविंद काळे, डॉ. कांत फडतरे, डॉ. शकील अत्तार, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. अभिजीत भोसले, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. जयदिप चव्हाण, डॉ. नारायण तांबे, डॉ. सौ. हर्षला बाबर, डॉ. सौ. सारीका मस्कर, अॅड. सुर्यकांत देशमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहरी डिंगणे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.