Follow us

Home » खेळा » क्रिडांगणावरील संस्कार विद्यार्थ्याच्या जीवनात नवचैतन्य घडविते – श्रीरंग काटेकर

क्रिडांगणावरील संस्कार विद्यार्थ्याच्या जीवनात नवचैतन्य घडविते – श्रीरंग काटेकर

क्रिडांगणावरील संस्कार विद्यार्थ्याच्या जीवनात नवचैतन्य घडविते :- श्रीरंग काटेकर

गौरीशंकर लिंब येथे वार्षिक क्रीडास्पर्धा संपन्न, उत्कृष्ठ खेळाडू‌चा बहुमान मुलीमध्ये आरती पाटील तर मुलामध्ये ऋतुराज चव्हाण यांनी मिळविला, विजेत्या स्पर्धकाना गौरविले.

लिंब :- क्रिंडागणावरील घडणारे संस्कार विद्यार्थ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने नवचैतन्य घङविते असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले आहे ते लिंब.ता.जि.सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल ऐज्युकेशन ॲन्ड रिसर्च लिंब महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडास्पर्धा 2023- 24 च्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ योगेश गुरव ,स्पोर्टस विभाग प्रमुख दुधेश्वर क्षीरसागर, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.माधुरी मोहीते,प्रा. डॉ संतोष बेल्हेकर अदि प्रमुख उपस्थित होते.

श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले कि शारिरिक व मानसिक तंदुरस्ती आजच्या काळाची खरी गरज आहे. विद्यार्थ्यांनी क्रिडागंणाशी नाते जोडून आपले आरोग्य निरोगी ठेवावे .

उपप्राचार्य डॉ योगेश गुरव म्हणाले की स्पर्धाच्या युगात शरीराकडे होणारे दुर्लक्ष भविष्यात घातक ठरत आहे. विद्यार्थ्यांनी स्वताचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी नियमितपणे व्यायामास प्राधान्य द्यावे

वार्षिक क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध खेळात उल्लेखनीय कामगिरी केली कॅरम, चेस, टेबल टेनिस खेळाबरोबरच मैदानी खेळात विशेषता कबड्डी, खो-खो, क्रिकेट ,व्हाॅलीबॉल, थ्रो बॉल, रस्सीखेच क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला विजेत्या स्पर्धकांना गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविले मुलींमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून आरती पाटील (द्वितीय वर्ष बी फार्मसी) तर मुलांमध्ये ऋतुराज चव्हाण (द्वितीय वर्ष बी फार्मसी)या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नूतन गावंडे व आभार दुधेश्वर शिरसागर यांनी मानले.

निरोगी आरोग्याचा मंत्र खऱ्या अर्थाने क्रीडा संस्कृतीत सामाविलेला आहे. आपले आरोग्य आपल्याच हाती असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी नियमितपणे व्यायामाला महत्त्व देत क्रीडांगणाशी नाते जोडले पाहिजे. विशेषता मोबाईल संस्कृतीपासून स्वतःला दूर ठेवून क्रीडांगणाशी समरस झाले पाहिजे. ध्वनी, जल ,वायू प्रदूषणाचा धोका पाहता आपले शरीर संपत्तीकडे विद्यार्थ्यांनी गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket