Follow us

Home » राजकारण » सातारा जिल्ह्यातील जनता महायुतीच्या पाठीशी- खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

सातारा जिल्ह्यातील जनता महायुतीच्या पाठीशी- खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

सातारा जिल्ह्यातील जनता महायुतीच्या पाठीशी- खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

मानसपुत्र म्हणणाऱ्यांचे नेतृत्व साडेतीन जिल्ह्यापुरते, सातारा लोकसभा मतदार संघात 40 सभा घ्या.यशवंत विचार सांगणाऱ्यांना आता काही काम उरलेले नाही. या मानसपुत्राने माझ्या विरोधात जिल्ह्यात चार सभा घेतल्या आहेत. त्यांचे नेतृत्व अवघ्या साडेतीन जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले आहे, तसेच आता त्यांच्याकडे काही काम उरलेले नाही, त्यांनी चार नाही तर 40 सभा घ्याव्यात. असे श्रीमंत छत्रपती उदयनराजे म्हणाले.

मानसपुत्रांच्या पक्षाला कोकण विदर्भ खानदेशात प्रतिनिधित्व उरलेले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यापुरतं त्यांना काम राहिलेले आहे. त्यामुळे माझ्यावर असलेल्या अतिप्रेमामुळे त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात चार सभा नियोजित केल्या आहेत. त्यांनी चार नवे 40 सभा घेतल्या तरी काही फरक पडणार नाही कारण सातारा जिल्ह्यातील जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

पापाचा वाटेकरी व्हायचं नव्हतं म्हणून राजीनामा दिला

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात मी राजीनामा दिला. त्यासाठी अनेक कारणे होती, राजीनामा देण्यापूर्वी ज्या जनतेने मला निवडून दिले त्या जनतेची मी संवाद साधायला हवा होता, त्याबाबतीत माझी चूक झाली मान्य करतो पण घोटाळे बहाद्दरांच्या बरोबर मी काम करू शकत नाही. माझा कोंडमारा झाला म्हणून मी राजीनामा दिला आणि पोटनिवडणूक लागली.

या भागातील जनता विकास कामाकडे बघून मते देते. लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजे उमेदवार असले तरी मीच उमेदवार आहे हे लक्षात घेऊन जनतेने उदयनराजेंच्या पाठीशी राहावे. 

– पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई.

यावेळी पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई, भाजपचे प्रदेश सचिव श्री भरत पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, एडवोकेट मिलिंद पाटील, बाबुराव नांगरे, रमेश पाटील, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते डी.पी.जाधव, अशोकराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket