Follow us

Home » ठळक बातम्या » सातारा जिल्ह्याला मिळणार आणखीन एक युवा खासदार? नितीनकाका पाटील 

सातारा जिल्ह्याला मिळणार आणखीन एक युवा खासदार? नितीनकाका पाटील 

वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील)

सातारा जिल्ह्याला मिळणार आणखीन एक युवा खासदार  खा.नितीनकाका पाटील 

25 जुनचा ठरला मुहुर्त 

.13 जुनपर्यंत अर्ज दाखल करणार 

. लक्ष्मणतात्यांच्या घरात पुन्हा खासदारकी

. उदयनराजेंच्या विजयाची पोहोचपावती

. सहकार अभ्यासकाला राष्ट्रीय न्याय

लोकसभा जिंकूनही राजीनामा देणारे उदयनराजे महाराष्ट्राचे केंद्रबिंदू होते. तर राज्यसभेचे खासदार असताना सुद्धा लोकसभा लढवल्यामुळे सातारा आणखीनच केंद्रबिंदू बनला. उदयनराजे निवडणूक जिंकल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय निवडणूक आयोगाने ‘महाराष्ट्राच्या राज्यसभा’ मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. उदयनराजेंनी आणि भाजपने दिलेले वचन आणि अजित पवारांनी वाईत केलेले भाषण यावरून साताऱ्याचा तिसरा खासदार नितीनकाका पाटील असतील असे मानले जात असून 15 वर्षानंतर लक्ष्मणतात्यांच्या घरात खासदारकीची वापसी होत आहे.

उदयनराजे भोसले यांनी गेल्या 15 वर्षांपासून लोकसभेच्या चार निवडणुका लढल्या. तीन वेळा त्यांना राष्ट्रवादीचे घड्याळ लाभले. पण चौथ्या वेळेला राष्ट्रवादीच्या घड्याळाने त्यांना पराभूत केले. ‘तीन महिन्यात खासदारकी सोडण्याचा धाडसी निर्णय’ घेतल्याबद्दल उदयनराजेंना राज्यसभा मिळाली.

राज्यसभेच्या खासदारकीची दोन वर्षे शिल्लक असतानाही त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवून ते जिंकून आले. या लोकसभेसाठी त्यांना शेकडो ठिकाणी तहाची बोलणी करावी लागली. यात मोठा तह ठरला तो वाईचा.

ऐन घमासानामध्ये उदयनराजेंच्या विरोधात जिल्हा बँक अध्यक्ष नितीनकाका तुतारी उचलणार, अशी परिस्थिती होती मात्र आमदार मकरंद आबांच्या निर्णयासोबत राहून नितीनकाकांनी आवंडी गिळली.

साताऱ्याचा दारोमदार वाईवर होता. त्यामुळे अजित पवार गटासोबत भाजपाने तडजोड करताना राज्यसभेची जागा अजित पवार गटाला म्हणजेच नितीनकाकांना द्यायचे निश्चित क

लोकसभेला उदयनराजे निवडून आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी आयोगाने निवडणूक जाहीर केली.

वास्तविक, सामान्य जनतेने नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेने विधानसभेत पाठवलेल्या आमदारांनी मतदान करायचे असते. त्याप्रमाणे आयोगाने नोटीस जारी केली आहे. मतदानाची तारिख 25 जून अशी जाहीर करण्यात आली आहे.

तात्यांच्या घरी पुन्हा खासदारकी

सातारा जिल्ह्यात सरपंचापासून खासदारकीपर्यंत पद भूषवण्यात तात्यांचे घराणं एकमेव. शिल्लक राहिलेली आमदारकी आबांनी भूषवली. 15 वर्षापूर्वी संपलेला खासदारकीचा प्रवास येत्या 25 जूनला पुन्हा सुरू होणार असल्याचे मानले जात आहे.

महाराष्ट्राच्या राज्यसभेची ही जागा भाजपाची आहे. नितीनकाका अजित पवार गटाचे. तरीही ते खासदार होणार असतील तर ते भाजपाचे खासदार होणार की अजित पवार गटाचे होणार ?

खरे तर ही निवडणूक पूर्णत: बिनविरोध होणार आहे. त्यामुळे नितीनकाकांनी चिन्ह घेण्याची गरज आहे का? यावरही चर्चा आहे.

महाराष्ट्रात अजित पवार गटाला लोकसभेसाठी एकच खासदार मिळाला असून दुसरा खासदार होत नितीनकाका केंद्रिय मंत्रीमंडळाच्या स्पर्धेत उतरतील.

राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या नोटिफिकेशन आणि राजकीय दाव्यांमुळे साताऱ्याला तिसरा खासदार मिळणार आहे. ते नितीन पाटील असतील! याकडे नजरा आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket