Follow us

Home » राजकारण » सातारा नगरपालिकेतील नगर विकास आघाडी – सातारा विकास आघाडी आमने सामने?

सातारा नगरपालिकेतील नगर विकास आघाडी – सातारा विकास आघाडी आमने सामने?

सातारा : सातारा नगरपालिकेमध्ये नगरसेवकांचे  धरणे आंदोलन अतिक्रमणावरून झाले.नविआ-साविआमध्ये धुसफूस; यामध्ये दिसून आली. मुळातच कार्यकर्त्यांना स्थानिक राजकारणात मनोमिलन पॅटर्न नको असल्याची चर्चा सातारमध्ये दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातारा शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मनोमिलन झाले.

परंतु सातारा नगरपालिकेच्या स्थानिक राजकारणात कार्यकर्त्यांची काट शहाचे राजकारण  चालूच आहे. येणाऱ्या सातारा नगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये मनोमिलन पॅटर्न यशस्वी होणार का ?

शनिवार पेठेतील क्रीडा संकुलातील कबुतरांच्या ढाबळीचे अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सातारा पालिकेत शुक्रवारी धरणे आंदोलन केले. दरम्यान, नगर विकास आघाडीचे नगरसेवक, यांनीही पालिकेत येऊन उपमुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. दोन्ही आघाड्यांमधील धुसफुशीमुळे तणाव निर्माण झाला.

शनिवार पेठेत श्री. छ. राजमाता जिजाऊ क्रीडा संकुलामध्ये कबुतरांच्या ढाबळीचे अतिक्रमण आहे. हे अतिक्रमण न हटवल्याने शुक्रवारपासून नगरसेविका स्मिता घोडके यांनी कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket