Follow us

Home » ठळक बातम्या » उद्योजक किरण बाबर यांना ‘सातारा प्राईड’ पुरस्कार प्रदान 

उद्योजक किरण बाबर यांना ‘सातारा प्राईड’ पुरस्कार प्रदान 

उद्योजक किरण बाबर यांना ‘सातारा प्राईड’ पुरस्कार प्रदान 

सातारा प्रतिनिधी – शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी हॉटेल सदगुरू  सातारा येथे सायंकाळी ठीक 8 वाजता सातारा न्यूज मीडिया वतीने दिला जाणारा सातारा प्राईड पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यंदाच्या वर्षीचा पुरस्कार किकली येथील प्रसिद्ध कापड व्यवसायिक भैरवनाथ टेक्स्टाईल पाचवड चे मालक युवा उद्योजक किरण बाबर यांना ‘सातारा प्राईड ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. किरण बाबर यांनी पाचवड ठिकाणी अद्ययावत भैरवनाथ टेक्स्टाईल च्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम कापड दर्जेदार माल आणि ग्राहकांच्या पसंतीला उरणारी सेवा या दोन महत्त्वाच्या गोष्टींमुळे आपले वेगळेपण जपले आहे. त्याचबरोबर अनेकांना उद्योगातून रोजगार देण्याचे महत्वपूर्ण कार्य ते करत आहेत. भैरवनाथ टेक्सटाईल मध्ये उत्कृष्ट दर्जाचे शर्टींग, शूटिंग, किड्स रेडीमेड, असंख्य प्रकारच्या साड्या शालू ग्राहकांच्या बजेटनुसार मिळत आहेत. लग्नबस्ता ची खास सोय असल्याने ग्राहकांचा कल भैरवनाथ टेक्सटाईल मध्ये खरेदीसाठी असतो.

युवकांनी नोकरी न करता उद्योग व्यवसायात आपले वेगळेपण जपले पाहिजे असा संदेश किरणजी बाबर युवकांना देतात.

पुरस्कार वितरण समारंभास प्राथमिक शिक्षक बँक अध्यक्ष किरण यादव साहेब, चंद्रविलास उद्योग समूहाचे प्रमुख वसंतशेठ जोशी, उद्योजक बाळासाहेब जगदाळे, उद्योजक सागर भोसले, उद्योजक संतोष जाधव, श्रीरंग काटेकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार जयंत लंगडे यांनी केले. तर अली मुजावर यांनी आभार मानले.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket