Follow us

Home » ठळक बातम्या » संवेदनशील मनाचा दिलदार राजा श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले

संवेदनशील मनाचा दिलदार राजा श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले

संवेदनशील मनाचा दिलदार राजा श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले

सातारा- सर्वसामान्य जनतेविषयी विशेष आपुलकी, प्रेम, जिव्हाळा व स्नेह असणारे सातारचे श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले हे एक आगळेवेगळे व्यक्तीमहत्व समाजभावनेशी एकरुप झालेला एक जाणता राजा स्वतःची प्रतिष्ठा, पत बाजूला ठेवून जनता जनार्दनाच्या सुख दुःखाशी समरस झालेले एक नेतृत्व छत्रपतीचे थेट 13 वे वशंज श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले यांचा दि. 24 फेब्रुवारी 2024रोजी वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्याने गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर याचा विशेष लेख

उदय अणि सिंह या शब्दरचनेत मोठे सामर्थ्य आहे. सुर्यादयप्रमाणे तेजस्वी व सिंहासारखे धैर्यवान असे महाराष्ट्रातील राजकिय पटलावरील एक स्वयंभू नेतृत्व म्हणून परिचीत असलेले श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले, या नेतृत्वाने उभ्या महाराष्ट्राला भुरळ पाङली आहे. बेधडक, रोखठोकपणे भूमिका हा त्याचा मूळ स्वभावमुळे संपुर्ण राज्यभर त्याचा मोठा दरारा आहे. न्यायाला साथ, अन्यायावर प्रहार हा त्याच्या जीवनशैलीचा एक भाग आहे. त्याच्या सहवासातील अनेकाचे जीवनमान त्यानी फुलविले आहे. तर अनेकाना आपला सोबती बनविले आहे. दिलदार मनाचा एकच जाणता राजा अशीच प्रतिमा त्याची जणमाणसात आहे.

श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले यांनी राजेशाहीची वस्त्रे दूर ठेवून जनमाणसाच्या व्यथा व वेदनासाठी झटणे हेच आपल्या आयुष्याचे ध्येय व धोरण ठेवून त्याची वाटचाल सुरु आहे. जनमाणसाच्या मनाचा ठाव घेवून मार्गक्रमण करणाऱ्याना श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले याच्यावर जनतेचेही अलोट प्रेम आहे. ‘राजे तुमच्या साठी कायपण’ करणारी तरुणाईचा मोठा फौजफाटा त्याच्या सोबत आहे. भक्ती शक्ती अणि सामर्थ्याचे एकच प्रतिक श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले अशी प्रतिमा संपूर्ण राज्यभर आहे. राजेपणाचा डामडैल न करता सामान्यातील सामान्य घटकाशी थेट संपर्क हे त्याचे खरे वैशिष्ठ आहे. समाजाच्या व्यथा व वेदना जाणणारे ते एक संवेदनशील नेतृत्व आहे. फणसाप्रमाणे त्याचे बाहय मन ठणक असले तरी अंतरमनात मात्र भावनिक ओलावा आहे. मनाची श्रीमंत अफाट असणारे ते एक भावमंदीर आहे.

सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात विशेष रुची घेणारे श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले यांची विविध रुपे आहेत. कलाकार अणि कलावंताच्या भावना जाणणारे ते एक संवेदनशील मनाचे राजे आहे. स्वतः एक रसिक असल्याने कलावंत व कलाकाराच्या भावना तेच जाणू शकतात. राज्यातील घडणाऱ्या अनेक घडमोडीत श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले हे नाव नेहमीच चर्चेत राहीले आहे. सामाजिकतेचे भान असणाऱ्या या नेर्तृत्वाने चुकीच्या धोरणाना कडाडून विरोध केला आहे. त्या ठिकाणी स्वकियाची सुध्दा मुलाहिंजा ठेवली नाही. स्पष्ट अणि परखड भूमिका घेणारे एक धडाडीचा नेता म्हणून संपूर्ण राज्यपातळीवर नाव श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले यांचे कोरले आहे.

सातारा जिल्हायाच्या प्रगतीबाबत नेहमीच अग्रेसर भूमिका घेताना अनेक वेळा शासन दरबारी व स्वकिय पक्षातील नेत्याशी संघर्ष करावा लागला. कोणतीही भिडभाड न ठेवता भूमिका स्पष्ट ठेवली यामुळे या जिल्हयातील अनेक जनहिताचे प्रश्न मार्गी लागले. शेती, सहकार, पर्यटन, आरोग्य, शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, औद्योगिक क्षेत्रातील असंख्य प्रश्नाना गती देवून सातारा जिल्हयात एक गतीमान विकासाच्या दृष्टीने पाऊल त्यानी टाकले. सातारच्या कास धरणाची उंची वाढविणे बरोबरच शिरवळ खंडाळा एम. आय. डी. सी. ला गती देणे याचबरोबरच कृष्णा खोरे व उरमोडी धरणाच्या विकासात्मक कामाला गती देवून खऱ्या अर्थाने एक प्रगतीचे पाऊल टाकले आहे.

राजकिय पटलावरील ते खरेच शहेनशहा आहेत. हे त्यांचे विरोधक ही मानतात. विचाराशी ठाम आणि सामान्य जनता ही केंद्रबिंदू मानून श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले यानी आपली राजकिय घोडदौड सुरु ठेवली आहे. व्दोषापासून दूर राहून समाज परिवर्तनाच्या लढाईत सर्वांना बरोबर घेवून जाताना अनेक वेळा विरोधकाप्रमाणे स्वकिय पक्षातील अनेकानी त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला. पण हे डाव जनता जनार्दनाच्या कृपेने व पाठबळामुळे श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले यांनी उधळून लावले स्वकियाचे कुटील डावपेच अखेर त्यांच्यावर उलटले हे फक्त श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसलेच करु शकतात. वेळप्रसंगी पक्ष नेतृत्वाला ही आव्हान देण्याचे धाडस दाखविणारे राज्यातील एकमेव उदाहरण श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले ठरले आहेत. स्वार्थापलीकडे जीवन जगणाऱ्याना कशाची भिती नसते ‘पक्ष गेला खडयात, जनता जनार्दन हा माझा पक्ष’ हे ठणकावून सांगणारे श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले हेच बोलू शकतात. त्यांच्यामधील आत्मविश्वास हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. तरुण तरुणाईच्या गळयातील ते ताईत आहेत. सिंहासारखे काळीज, वाघासारखी झेप, गरुडासारखी भरारी घेण्याचे सामर्थ्य फक्त श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले यांच्यामध्ये आहे हे मात्र विसरुन चालणार नाही.

श्रीरंग काटेकर सातारा

जनसंपर्क अधिकारी गौरीशंकर नाॅलेज सिटी

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket