Follow us

Home » खेळा » ‘एकनाथ शिंदे हे स्वतः गुन्हेगार, त्यांच्या मुलाने तर गल्लीतले भुरटे गुन्हेगार गोळा केलेत’; ठाकरे गटाच्या नेत्याची टीका

‘एकनाथ शिंदे हे स्वतः गुन्हेगार, त्यांच्या मुलाने तर गल्लीतले भुरटे गुन्हेगार गोळा केलेत’; ठाकरे गटाच्या नेत्याची टीका

‘एकनाथ शिंदे हे स्वतः गुन्हेगार, त्यांच्या मुलाने तर गल्लीतले भुरटे गुन्हेगार गोळा केलेत’; ठाकरे गटाच्या नेत्याची टीका

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी सत्ताधारी शिंदे गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे स्वतः गुन्हेगार आहेत. असा घणाघात शरद कोळी यांनी केला.

पुणे : राजकीय वर्तुळामध्ये सध्या गुंडाच्या राजकीय पक्ष प्रमुखांसोबत होणाऱ्या भेटीगाठींची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याची भेट घेतली. याचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या प्रकरणावरुन आता शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी (Sharad Koli) यांनी सत्ताधारी शिंदे गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे स्वतः गुन्हेगार आहेत. असा घणाघात शरद कोळी यांनी केला.

पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना शरद कोळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. शरद कोळी म्हणाले,  “एकनाथ शिंदे हे स्वतः गुन्हेगार आहेत. त्यामुळे ते येत्या 2024 च्या निवडणूकीसाठी गुंडांची जमवाजमवी करत आहेत. दिवसाढवळ्या त्यांनी पुढच्या निवडणूकीचे स्वप्न पडू लागले आहेत. मतदारांना आता धमकावण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी हे हवशे, गवशे, नवशे गोळा करत आहेत. त्यांत नवल काही नाही कारण, त्यांच्या पाचवीला पुजलेलं काम आहे.” असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.


Source link

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket