वैचारिक प्रगल्भतेतून प्रगतशील समाज घडविण्यात शिक्षकांचे मोलाचे योगदान – श्रीरंग काटेकर
लिंब – ज्ञानसंपन्न समाज निर्मिती बरोबर सुसंस्कृत समाज घडविताना वैचारिक प्रगल्भतून केलेले परिवर्तनामध्ये शिक्षकांची भूमिका निर्णायक ठरली असल्याचे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते लिंब ता,जि सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात 5 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय शिक्षकदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते
यावेळी प्राचार्य डॉ.योगेश गुरव, डॉ.संतोष बेल्हेकर ,डॉ. भूषण पवार, डॉ. धैर्यशील घाडगे, प्रा. माधुरी मोहिते प्रा स्वप्नाली झोरे अदि प्रमुख उपस्थित होते.
श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की ङाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे हाडाचे शिक्षक होते त्यांनी भारताचे नाव जागतिक स्तरावर पोहोचविले आदर्श विचारसरणीच्या जोरावर त्यांनी देशाचे उपराष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली.
प्राचार्य डॉ योगेश गुरव म्हणाले की विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांची भूमिका मोलाची ठरते शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते हे गुरु शिष्यासारखे असते आपला शिष्य उत्तम घडावा यासाठी शिक्षक आयुष्यभर धडपडत असतो.
प्रारंभी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रंथालय विभागातर्फे घेण्यात आलेल्या पुस्तक परीक्षण व रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. धैर्यशील घाडगे, प्रा. कीर्ती माने ,प्रा. स्वप्नाली झोरे , ग्रंथालय विभागाचे विजय निकम, मीनाक्षी घार्गे आदींनी परिश्रम घेतले.
ऋणानुबंधाचे नाते जाणूया राष्ट्र समृद्ध घडवूया
प्रगतशील भारताची स्वप्नपूर्तीसाठी शिक्षक व विद्यार्थी यांचे एक अतूट नाते असते स्वतःच्या सर्वगीन प्रगती बरोबरच राष्ट्र प्रगतीचा ध्यास घेऊन शिक्षक आपले योगदान देत असतात समाज सुसंस्कृत व विज्ञानवादी घडला तर देशाच्या प्रगतीचे ध्येय सहज साध्य करता येते हा आत्मविश्वास उंचावण्याचे कार्य शिक्षक आयुष्यभर करत असतातया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कु.गीतांजली होले हिने केले.