Follow us

Home » राज्य » श्रीमंत छञपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल भरतगाववाडीत कूपर उद्योग समुहाच्यावतीने ‘ग्रंथ संपदा’ प्रदान

श्रीमंत छञपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल भरतगाववाडीत कूपर उद्योग समुहाच्यावतीने ‘ग्रंथ संपदा’ प्रदान

श्रीमंत छञपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल भरतगाववाडीत कूपर उद्योग समुहाच्यावतीने ‘ग्रंथ संपदा’ प्रदान.

कूपर उद्योग समूहाच्या माध्यमातून मा. श्री फरोख कूपर साहेब अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक दायित्व योजने अंतर्गत समाज व शैक्षणिक विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. नुकतेच श्रीमंतछञपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल, ‘भरतगाववाडीत कूपर उद्योग समुहाच्यावतीने ५ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रंथ संपदा’ प्रदान करण्यात आली. सदर ग्रंथालयाचे उद्घाटन “कूपर उद्योग सुमहाचे” मा. श्री. नितीन देशपांडे मुख्य मानव संसाधन अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन कार्यकम समारंभास मा. श्री. सुनिल काटकर माजी शिक्षण व अर्थसभापती उपस्थित होते.

उद्घाटन समारंभावेळी मा. श्री. नितीन देशपांडे यांनी, “या ग्रंथ संपदेचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी नक्कीचं याचा फायदा होईल, आयुष्यात पुढे जाण्यासाठी पुस्तके मार्गदर्शक ठरतील”, असे मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी दररोज एक पुरक वाचून अभिप्राय कळवावा व संपूर्ण पुस्तके वर्षभरात वाचण्याचे चॅलेन्ज दिले व विद्यार्थ्यांनी हात वर करून स्वीकारले.

मा. श्री. सुनिल काटकर यांनी, “कूपर परिवाराचे सामाजिक बांधिलकीचे नाते हे साता-यातील लोकांशी पिढ्यांपिढयाचे आहे, तसेच मा. कूपर साहेब व सातारच्या राजघराण्याचे ऋणानुबंध पहिल्यापासूनच अतिशय जवळचे व कौटुंबिक आहेत. या कूपर घराण्याने व उद्योग समूहाने नेहमीच अनेक समाजाभिमुख उपकम यशस्वीपणे राबविले आहेत. कूपर उद्योग समूहाच्यावतीने साता-यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे व या माध्यमातून त्या कुटुंबाचा व समाजाचा विकास होण्यास मोलाचा हातभार लाभत आहे. या अशा प्रकारच्या समाजाभिमुख उपकमासाठी भरतगाववाडीतील ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन कमिटी, कर्मचारी व विद्यार्थी वर्ग कूपर उद्योग समूहाचे आभारी आहेत”, असा आपल्या मनोगतात उल्लेख केला.

सदर उद्घाटन कार्यक्रमास ज्या मार्फत सदर हायस्कूल कार्यरत आहे त्या मंडळाचे अध्यक्ष व कूपर उद्योग समूहाचे कर्मचारी श्री. प्रदीप काटकर, कूपर उद्योग समूहातील श्री महेश खरे, श्री दत्तात्रय पोतेकर व गावातील रहिवासी कूपर उद्योग समूहातील कामगार व कर्मचारी श्री दिपक ढाणे, श्री दिनेश काटकर, श्री. प्रितम शेडगे, श्री. गणेश ढाणे, श्री राहुल शेडगे, श्री सुशांत शेडगे, श्री रमेश शेडगे, श्री गणेश पिसाळ, श्री. किशोर पडवळ, श्री धीरज जाधव, श्री. ताजुद्दीन शेख, श्री. प्रथमेश कदम, श्री सुरज शेडगे, श्री. दत्ताञय जेधे व इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्याद्यापक श्री भरत मोझर यांनी कार्यकमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket