श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झेंडा दाखवून सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात
सातारा-सातारा रनर्स फाउंडेशन तर्फे आयोजित तेराव्या सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाला.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. आदिती घोरपडे, अॅड. कमलेश पिसाळ, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, डॉ. संदीप काटे, विशाल ढाणे, डॉ. गोळे यांच्यासह सातारा रनर्स फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व देशभरातून आलेल्या धावपटूंची उपस्थिती होती.
यावेळी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले म्हणाले साताऱ्यातील हिल मॅरेथॉन जगातली प्रतिष्ठेची डोंगरावरील धावण्याची स्पर्धा आहे. तेरा वर्षांपूर्वी कास पठारावरील घाटाई मंदिरापाशी डॉक्टर शेखर घोरपडे यांच्यासह पाहिलेलं फिटनेस स्वप्न प्रत्यक्षात पाहताना खूप बरं वाटतं.आयुष्यात ध्येय असलं पाहिजे. ते पूर्ण करण्यासाठी शक्ती आणि युक्ती पाहिजे. त्यासाठी फिजिकल फिटनेस हवा, आणि ही स्पर्धा त्यासाठी आहे.यात जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावं. स्पर्धक आणि सर्व आयोजक या सगळ्यांना श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे यांनी शुभेच्छा दिल्या.