Follow us

Home » राज्य » शिक्षण » श्यामची आई’ या पुस्तकाच्या क्रमिक वाचनाने विद्यार्थ्यांचे भावविश्व समृद्ध होण्यास झाली अधिक मदत : अरुण मरभळ

श्यामची आई’ या पुस्तकाच्या क्रमिक वाचनाने विद्यार्थ्यांचे भावविश्व समृद्ध होण्यास झाली अधिक मदत : अरुण मरभळ

श्यामची आई’ या पुस्तकाच्या क्रमिक वाचनाने विद्यार्थ्यांचे भावविश्व समृद्ध होण्यास झाली अधिक मदत : अरुण मरभळ.

महाबळेश्वर: शिक्षण विभाग पंचायत समिती महाबळेश्वर आणि प्राथमिक शिक्षक वाचनालय महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने या शैक्षणिक वर्षी मे आणि जून महिन्यात तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद व नगरपरिषद प्राथमिक शाळांमध्ये ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे क्रमिक वाचन घेण्यात आले. सदर उपक्रमाच्या सांगता समारंभ प्रसंगी पंचायत समिती महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ अधिकारी यांनी वाचनाचे महत्त्व विषद केले…’जसे शरीरास अन्न तसे आपल्या मनास वाचन’ फार महत्त्वपूर्ण बाब असल्याचे अधोरेखित करताना त्यांनी श्यामची आई या पुस्तकाच्या वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्काराबरोबर चांगल्या सवयी बाणण्यास मदत होत असते..असे सांगून त्यांनी स्वतः ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाचे वाचन अखंडित केल्याचा प्रसंग वर्णन केला. महाबळेश्वर तालुक्यातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावून वाचन विकास चळवळ उभी करण्याबाबत आवाहन केले..दुर्गम असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात गावा-गावातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक शास्त्रज्ञ, संशोधक दडले आहेत. त्यांच्या विचारांना चालना मिळावी यासाठी अशा पुस्तकांचे क्रमिक वाचन नित्य नियमितपणे करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले…

सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र भिलारे, प्राथमिक शिक्षक वाचनालयाचे अध्यक्ष दगडू ढेबे, सचिव संतोष शिंदे व संचालक उपस्थित होते..

वाचनकट्टा उपक्रमांतर्गत ‘श्यामची आई’ पुस्तिकेवर आधारित घेण्यात आलेल्या ऑनलाईन चाचणीतील एकूण १८६१ विद्यार्थ्यांच्या प्रतिसादांमधून इयत्तानिहाय प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ‘श्यामची आई’ पुस्तक, प्रमाणपत्र आणि बक्षीस रक्कम देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करण्यात आले..

गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी शालेयस्तरावर वाचन संस्कार विद्यार्थ्यांवर बिंबवणेसाठी पालक आणि शिक्षक यांची महत्वाची भूमिका असलेचे नमूद केले लक्षपूर्वक आणि आकलनपूर्वक वाचन करण्यास सदर उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.वाचनाने व्यक्तीचे व्यक्तिमत्व समृद्ध बनते विचारशील समाजशील मन तयार होण्यास वाचनच एकमेव पर्याय असल्याचे अधोरेखित केले.. सुयोग्य वेगासह वाचन करणे ही एक कला शालेय जीवनातच अवगत होऊ शकते त्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचते व्हावे या दृष्टिकोनातून श्यामची आई पुस्तकानंतर वीणा गव्हाणकर लिखित ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाचे क्रमिक वाचन शाळा-शाळांमध्ये सुरू करावे..असेही त्यांनी शिक्षकांना आवाहन केले. 

तत्प्रसंगी सन २०२४ मध्ये महाबळेश्वर तालुक्यातील शिक्षण सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला..त्यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांनी प्राथमिक शिक्षक वाचनालयास दहा हजार रुपयांची पुस्तके भेट देण्याचे अभिवचन दिले.

कार्यक्रमास सत्कारमूर्ती विलास जाधव, सुनील भिलारे, प्रकाश मोरे, भाऊसाहेब दानवले, आनंदा भिलारे, बन्सीलाल निकाळजे व कमल सावंत यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करणेत आला..तसेच मतदान जनजागृतीच्या अनुषंगानेच आयोजित चित्ररथामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व शिक्षकांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करणेत आला.

या कार्यक्रमास वाचनालयाचे संचालक अरविंद चोरट, सरस्वती ढेबे, रुपाली कारंडे,विठ्ठल सपकाळ, अशोक राऊत, शिक्षण विभागातील सुहास कुलकर्णी, विषयतज्ज्ञ सचिन चव्हाण, कुलदीप अहिवळे, अभिजीत खामकर, श्रीनिधी जोशी, पूनम घुगे मार्गदर्शक शिक्षक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाधान देशमुख, श्रीगणेश शेंडे, अशोक राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू ढेबे यांनी केले तर आभार अरविंद चोरट यांनी मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket