Follow us

Home » राज्य » शिक्षण » जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श करण्यासाठी समाजाचा सहभाग आवश्यक: जिल्हा परिषद CEO याशनी नागराजन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श करण्यासाठी समाजाचा सहभाग आवश्यक: जिल्हा परिषद CEO याशनी नागराजन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श करण्यासाठी समाजाचा सहभाग आवश्यक: जिल्हा परिषद CEO याशनी नागराजन

महाबळेश्वर, : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्श करण्यासाठी शासनाबरोबरच समाजाचाही सहभाग अत्यंत आवश्यक आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी व्यक्त केले. मेटगुताड (ता. महाबळेश्वर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आयोजित आजी-माजी विद्यार्थी शैक्षणिक मेळाव्याच्या अनुषंगाने त्या बोलत होत्या.

शाळांच्या भौतिक गरजा पूर्ण करणे आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे यासाठी शिक्षकांसोबतच समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासाठी शाळेची इमारत, अभ्यासक्रमाचे साहित्य, शिक्षकांसाठी प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी सुविधा यासारख्या भौतिक गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासोबतच, शिक्षकांनी प्रभावी अध्यापन पद्धतींचा अवलंब करून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे आणि चांगल्या शिक्षणाचा पाया रचणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मन लावून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत.

या मेळाव्यात महाबळेश्वर तालुक्यातील विविध शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करण्यात आले. तालुक्यातील शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले. प्राथमिक शिक्षकांसाठी सुरू असलेल्या वाचनालयाबाबत गौरवोद्गार काढून सर्वांना पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

 

दरम्यान, राधाकृपा आश्रम भोसे-भिलार यांच्याकडून तालुक्यातील 25 शाळांना देण्यात येणारे एलसीडी दूरदर्शन संच मेटगुताड शाळेला सुपूर्द करण्यात आले. या मेळाव्याच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी अरुण मरभळ आणि गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी सर्व उपस्थितांना आदर्श शाळेबाबत मार्गदर्शन करून लोकसहभाग देण्याचे आवाहन केले.

 

या मेळाव्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल बावळेकर, सरपंच महादेव ओंबळे, भिकन बावळेकर, संजय बावळेकर, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, सहा. गटविकास अधिकारी सुनील पारठे, उपअभियंता संजय जाधव, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, शाखा अभियंता संतोष गोरे, सुरेंद्र पारखे, विस्तार अधिकारी सुनील चिकणे, कनिष्ठ अभियंता साधना पोरे आणि सुहास कुलकर्णी यांचा समावेश होता.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket