Follow us

Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सामाजिक कार्याचा दीपस्तंभ : स्वर्गीय आनंद (आण्णा) कोल्हापुरे

सामाजिक कार्याचा दीपस्तंभ : स्वर्गीय आनंद (आण्णा) कोल्हापुरे

  • सामाजिक कार्याचा दीपस्तंभ : स्वर्गीय आनंद (आण्णा) कोल्हापुरे

वाई प्रतिनिधी : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वाई शहराच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रगतीमध्ये स्वर्गीय आनंद (आण्णा) कोल्हापुरे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आज 10 जून स्वर्गीय आनंद कोल्हापुरे यांचा जयंती दिवस.

सामाजिक कार्याने प्रेरित असलेल्या स्व.आनंद कोल्हापुरे यांनी सुदृढ व सशक्त पिढी घडविण्याच्या उद्देशाने १९९२ साली वाई जिमखाना या क्रीडा संस्थेची स्थापना केली. सर्व सामान्य व्यक्तींच्या स्वप्न पूर्तीसाठी अर्थकारणातही काहीतरी करूयात या भावनेने १९९९ साली उत्कर्ष पतसंस्थेची स्थापना केली. कर्तृत्व, नेतृत्व व वक्तृत्व यांचा अगम्य संगम असणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्व. आनंद (आण्णा) कोल्हापुरे. वाई शहरातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ असणारे वाई जिमखाना स्वर्गीय आनंद (आण्णा) कोल्हापुरे यांच्या व्हिजनरी दृष्टिकोनामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडू वाई शहरांमध्ये निर्माण होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य उत्कर्ष नागरी पतसंस्था वाईच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आर्थिक प्रगती साधण्यास मदत होत आहे. स्वर्गीय आनंद
(आण्णा )कोल्हापूरे यांचा वारसा आज अमर कोल्हापुरे सक्षम पडे पुढे नेऊन वाई शहराच्या नावलौकिकात भर घालत आहेत.स्वर्गीय आनंद अण्णा कोल्हापुरे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket