Follow us

Home » राज्य » शिक्षण » सोसायटी सचिवाचा मुलगा झाला C A …

सोसायटी सचिवाचा मुलगा झाला C A …

सोसायटी सचिवाचा मुलगा झाला C A …

सातारा (पत्रकार महेंद्रआबा जाधव)मूळचे चिंचणीचे व सारखळ ता. जि. सातारा येथील श्री आनंदराव सावंत यांनी सहकारात सोसायटी सचिव म्हणून इमानेइतबारे सेवा करितच आपल्या दोन्ही मुलात आपले स्वप्न पहिले आणि ते सत्यात उतरले. मुलांनी ही वडील आनंदराव व आई सौ. सत्वशिला यांची अपार मेहनत, उपसलेले काबाडकष्ट आणि दिलेल्या संस्काराची परफेड केली. जिद्द व चिकाटीच्या जोरावर शिक्षण घेत आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. थोरला भाऊ अक्षयचा C A फायनलचा निकाल आज लागला आणि अजिंक्यतारा सह. साखर कारखान्यात लेखा विभागात कार्यरत असलेल्या छोटा भाऊ अजयच्या आनंदाला पारावारचं उरला नाही. आख्या कार्यालयात व सर्व विभागात पेढे वाटून अजयने भाऊ C A झाल्याचा आनंद व्यक्त केला.

अक्षय..! तुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळाले.. तुझ्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन..! भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच अनेक पदव्या आणि यश पादाक्रांत करशील असा विश्वास आहे. अशा शब्दात आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्ष श्रीमंत छत्रपती सौ. वेदांतीकाराजे भोसले, अजिंक्यतारा सह. साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, महाबळेश्वरचे नायब तहसीलदार विनोद सावंत, युवा नेते राहूल काळे यांनी कौतुकपर अभिनंदन केले

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket