दक्षिण तांबवे शाळेकडून वसंतगडावर स्वच्छता, वृक्षारोपण
कराड :- दक्षिण तांबवे (ता. कराड) येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्रावणी सहलीच्या निमित्ताने ऐतिहास वसंतगड किल्ल्याची स्वच्छता केली. यावेळी इतिहास अभ्यासक अतुल मुळीक आणि दुर्गप्रेमी दत्तात्रय जामदार यांनी मार्गदर्शन केले.
श्रावणी सहलीत चिमुकल्या विध्यार्थ्यांनी श्री. चंद्रसेन महाराज परीसराची स्वच्छता केली. छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, तळबीड गावच्या ताराराणी, छ. राजाराम महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याविषयी माहिती देण्यात आली. वसंतगड हा किल्ला छ. शिवाजी महाराज यांच्या जन्मा अगोदरचा असून या किल्ल्यावर मराठे, मुघल आणि इंग्रजांनी राज्य केले असल्याची माहिती इतिहास अभ्यासक अतुल मुळीक यांनी सांगितले.
या सहलीसाठी मुख्याध्यापक आबासाहेब साठे, उपशिक्षक श्री. सोनवणे सर, तुषार पाटील, विशाल पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले.
विद्यार्थ्यांना ट्रेकिंगचा अनुभव
वसंतगड किल्ल्यावर चिमुकल्या विध्यार्थ्यांनीं चालत जावून ट्रेकिंगचा अनुभव घेतला. या मध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जादा होती. तसेच किल्ला परिसर पाहून ऐतिहास वास्तूची माहिती घेतली.