Follow us

Home » ठळक बातम्या » महाबळेश्वर आगारात नवीन बसेस दाखल – सतीशदादा ओंबळे यांचे विशेष प्रयत्न

महाबळेश्वर आगारात नवीन बसेस दाखल – सतीशदादा ओंबळे यांचे विशेष प्रयत्न

महाबळेश्वर बस आगारात नवीन बसेस दाखल

दि ०९ महाबळेश्वर तालुक्यासाठी मुख्यमंत्री याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सतीश दादा ओंबळे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना वारंवार महाबळेश्वर तालुक्यातील एस टी बस बाबत होणारी कमतरता जाणवत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकाना ये जा करण्यासाठी होणारी गैरसोय या बाबत सतीश दादा ओबळे यांनी खासदार श्रीकांत शिंदे याना सांगून महाबळेश्वर आगारास नवीन १२ बस देण्यात आल्या या एस टी बसेस चे आज दुपारी महाबळेश्वर आगारात लोकार्पण करण्यात आले.

      महाबळेश्वर मध्ये एस.टी .च्या ताफ्यात १२ नवीन बस दाखल महाबळेश्वर मध्ये आता पर्यत ३५ एस टी बस असून आता या मध्ये १२ एस टी नव्याने दाखल झाल्यामुळे आता महाबळेश्वर बस आगारात ४७ वाहने उपलब्ध झाले आहेत 

महाबळेश्वर शहरात ग्रामीण भागातून येणाऱ्या शालेय विद्यार्थीना वेळेवर बस न मिळणे तसेच महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ येथील पर्यटकांना देखील या बस सुविधा मुळे गैरसोय होत आहे येथील ग्रामीण भागातून येणारे नागरिक यांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी देखील नागरिकांची देखील गैरसोय होत होती एसटी आगारातील ज्या गाड्या आहेत त्यां ना दुरुस्त असल्याने अपघाताची शक्यता जास्त होती अनेक वेळा प्रवाशांना वाहने रस्त्यात बंद पडल्याने दुसऱ्या वाहनांचा आधार घेऊन प्रवास पूर्ण करावा लागत होता संपूर्ण तालुका घाटमय असल्याने नवीन सुस्थितीतल्या गाड्यांची आवश्यकता होती तसेच महाबळेश्वर एसटी डेपो आगारातील गाड्यांची कमतरता असल्याने वेळेचे कोणती नियोजन राहिले नव्हते या कारणामुळे ग्रामीण भागातील लोकांना ३ते४ कि मी रात्री अपरात्री डोंगरदर्‍यातून चालत प्रवास करावा लागत होता यामुळे महाबळेश्वर मधील काही लोकप्रतिनिधी या बाबत आवाज उठवून देखील या कडे दुर्लक्ष करण्यात आले अखेर सतीश दादा ओंबळे यांनी खासदार श्रीकांत शिंदे साहेबाकडे महाबळेश्वर बस आगारा बाबत वारंवार पाठपुरावा घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाबळेश्वर लोकार्पण करण्यात आले यावेळी सतीश दादा ओंबळे, महाबळेश्वर बस आगाराचे आगार व्यवस्थापक; वैभव कांबळे लेखापाल महेश शिंदे वाहतुक निरिक्षक सातारा मदने प्रल्हाद वरिष्ठ लिपिक मिथुन घोणे सहाय्यक वाहतुक निरिक्षक: यशवंत पवार,लेखनिक अभिजीत जमदाडे शंकर कांबळे,यशवंत लोखंङे,प्रशांत निकम तसेच बस चालक व वाहक तसेच सजंय (बाबा)ओबळे , श्रीकांत जांभळे ,ओमकार पवार सानू जाधव आदि शिव सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket