Follow us

Home » ठळक बातम्या » व्यसायभुमुखी शिक्षणातून विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे – श्रीनिवास वाठारे

व्यसायभुमुखी शिक्षणातून विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे – श्रीनिवास वाठारे

व्यसायभुमुखी शिक्षणातून विद्यार्थ्यांनी उद्योजक व्हावे – श्रीनिवास वाठारे

गौरीशंकर लिंब फार्मसी मध्ये स्वावलंबी भारत अभियानाचे आयोजन, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, आत्मनिर्भर भारताचा नारा

लिंब – व्यसायभुमुखी शिक्षण काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी या शिक्षणातून स्वतःचे कौशल्ये विकसित करून उद्योजक व्हावे असे मत उद्योजक श्रीनिवास वाठारे यांनी व्यक्त केले ते लिंब ता. जि. सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात स्वावलंबी भारत अभियान अंतर्गत बेरोजगार मुक्त भारत निर्माण आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर ,उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव, डॉ. संतोष बेल्हेकर, डॉ. धैर्यशील घाडगे, प्रा. दुधेश्वर क्षीरसागर, प्रा. रजनीकांत सावंत, स्वावलंबी भारत अभियानाचे अॅङ. योगेश सातपुते, विशाल साळुंखे, आशिष शहाणे, स्वप्निल माने अदि प्रमुख उपस्थित होते.

श्रीनिवास वाठारे पुढे म्हणाले की भारत एक महासत्ता राष्ट्र म्हणून पुढे येत आहे राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नवतरुणाईमध्ये उद्योग व्यवसाय व स्वंयरोजगाराने घडविणे आवश्यक आहे. उद्योजकतेचा मंत्र देऊन भारत आत्मनिर्भर घडविण्याचा ध्यास स्वावलंबी भारत अभियानाने घेतला आहे अॅङ.योगेश सातपुते म्हणाले बेरोजगारीच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न व जनजागृती तसेच सर्वसामावेशक नियोजन आवश्यक आहे. स्वावलंबी भारत अभियान हा बेरोजगारी दूर करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या सहकार्याने राबवलेल्या एक उपक्रम आहे.

प्रारंभी स्वावलंबी भारत अभियानातून उद्योजक घडवण्याचा ध्यास घेऊन वाटचाल करणाऱ्या उपक्रमाचे गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी कौतुक करून उद्योजक श्रीनिवास वाठारे यांना बुके देऊन त्यांचा उचित गौरव केला.

कौशल्य विकसित मनुष्यबाळास चालना देऊन नवभारत घडवण्याचा ध्यास घेऊन वाटचाल करणारे स्वावलंबी भारत अभियान जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात उद्योजकतेचे प्रशिक्षण व उद्योग व्यवसायासाठीचे मोफत मार्गदर्शन करण्याबरोबरच उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वावलंबी भारत अभियान वचनबद्ध आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शरद पवारांची यशवंत विचारांवर बोलायची लायकी नाही -आमदार महेश शिंदे

सातारा प्रतिनिधी :शरद पवारांचीं यशवंत विचारावरती बोलायची लायकी नाही असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असे कि चव्हाण साहेब ज्या वेळेला

Live Cricket