Follow us

Home » खेळा » राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धात कूपर वॉरिअर्सचा डंका

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धात कूपर वॉरिअर्सचा डंका

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धात कूपरचा डंका

  • २७ वी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा – २०२४ ग्रामीण पुरूष गटात महाराष्ट्रातील औद्योगिक व व्यावसायिक कामगारांसाठी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेले होती. सदर कबड्डी स्पर्धेमध्ये कूपर उद्योग समूहाकडून ‘कूपर वॉरिअर्स’ संघाने उपांत्य सामन्यात अतीशय चुरशीने लढत देत तिस-या कमांकावर विजय मिळवत चषकावर नाव कोरले. सदर स्पर्धेसाठी राज्यातून एकूण ११५ संघ सहभागी झालेले होते.

कूपर उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. फरोख कूपर साहेब व श्री. नितीन देशपांडे (CHRO) व इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कूपर उद्योग संघाने सर्व सामन्यांमध्ये अतीशय कौशल्याने खेळत उपांत्य फेरीत धडक मारत तृतीय क्रमांकासाठी चषक व रोख पारितोषिक रू. २०,०००/- पटकाविले. विजेत्या संघाला मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार मा. श्री. भाई जगताप, कामगार कल्याण आयुक्त मा. श्री. रविराज इळवे, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाहक मा. श्री. विश्वास मोरे, नवरोसजी वाडीया हॉस्पिटलचे सचिव मा. श्री. दिलिप शहा, मा. श्री. संतोष चव्हाण आदींच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

विजेत्या संघातील खेळाडू श्री कानिफनाथ अर्जुन भिसे, श्री योगेश दिलीप यादव, श्री. विजय शंकर बरकडे, श्री. नारायण सुहास पमनानी, श्री. विनायक चंद्रकांत पावसकर, श्री. गौरव हणमंत देवगुडे, श्री. विकी दादासाहेब कुंभार, श्री लक्ष्मण गंगाधर हजारे, श्री. निशांत विठ्ठल शिंदे, श्री. विशाल सुभाष इंगवले यांचे कूपर उद्योग समूह व्यवस्थापन, वरिष्ठ अधिकारी व कामगार, कर्मचारी यांच्यावतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन!

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket