राज्यस्तरीय फार्मा क्रिकेट कप गौरीशंकरने पटकविला…
16 संघांचा सहभाग, गौरीशंकरचा तेजस सुतार उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान तर श्रीकांत ठोंबरे ठरला बेस्ट बॅटसनचा मानकरी
देगाव – कासेगाव जिल्हा सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय फार्मा क्रिकेट कप स्पर्धेत गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी देगाव महाविद्यालयाने नेत्रदीपक कामगिरी करीत औषधनिर्माण शास्त्र क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा फार्मा क्रिकेट कप जिंकला आहे. या स्पर्धेत खेळाङूनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे संस्थेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. गौरीशंकरच्या विजय संघाला रोख रुपये दहा हजार चे बक्षीस देऊन गौरविले आहे. अंतिम सामन्यात गौरीशंकरच्या संघाने कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालय कराडवर दणदणीत विजय मिळविला या सामन्यात विशेष चमकदार कामगिरी करणाऱ्या तेजस सुतार यास मॅन ऑफ द मॅच ने गौरविले तर उत्कृष्ट बॅट्समन चा बहुमान श्रीकांत ठोंबरे याला प्राप्त झाला तसेच उपांत्य फेरीतील सामन्यात महाविद्यालयाचा रोहन शेलार मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.
विजेत्या संघाचे नुकताच गौरीशंकरच्या देगाव फार्मसी महाविद्यालयात संस्थेचे संचालक डॉ.अनिरुद्ध जगताप, प्रशासकीय अधिकारी नितिन मुङलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ. नागेश अलूरकर. यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.
विजेत्या संघाला प्रबंधक हेंमत काळे सुरज महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले .
यशस्वी खेळाडूचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, डिप्लोमा फार्मसी चे विभागप्रमुख डॉ. अविनाश भोसले, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. मनोज शिंदे यांनी अभिनंदन केले.
– महाविद्यालयातील खेळाडूंनी राज्यभरातील अनेक क्रीडा मैदाने गाजवली आहेत विशेषतः क्रिकेट स्पर्धेत गौरीशंकरचे सातारा कॉलेज ऑफ फार्मसीच्या खेळाडूंनी विजयाची पताका फडकवून ही परंपरा कायम ठेवली आहे. आजवर राज्यस्तरीय व विद्यापीठस्तरीय क्रिकेट स्पर्धेतील चढता आलेखाचा महाविद्यालयास सार्थ अभिमान वाटत आहे.