Follow us

Home » राज्य » संघर्ष योद्धा -नंदकुमार धोंडीबा गोरे

संघर्ष योद्धा -नंदकुमार धोंडीबा गोरे

संघर्षवान उद्योजकाचा यशस्वी जीवनप्रवास!

आजपर्यंतच्या जीवनात भेटलेल्या, आठवणील्या, सहवासातल्या, स्मरणात कोरल्या गेलेल्या खास उद्योजकांपैकी एक असलेल्या नंदकुमार धोंडीबा गोरे (नंदूशेठ) वय-४८ यांचा संघर्षमय, खडतर जीवनप्रवास थोडक्यात उलगडण्याचा शब्दरूपी केलेला हा प्रयत्न..खास त्यांच्या “जय मल्हार” या पुष्पकाच्या प्रथम वर्धापन दिनी..

अठराविश्व दारिद्र्य असलेल्या एका डोंगराळ भागातील शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीने, ज्या व्यक्तीला एकवेळच्या जेवणाची पंचाईत होती, त्याने परिस्थितीला शरण न जाता, गरिबीत प्रचंड संघर्ष करत, खडतर परिस्थितीवर मात करून प्रचंड जिद्दीच्या बळावर उद्योग क्षेत्रात यशस्वी झेप घेत समाजासमोर नवा आदर्श घालून दिला आहे. 

जावळी तालुक्यातील मौजे दूंद मधील जयवंता धोंडीबा गोरे या मातोश्री च्या पोटी फेब्रुवारी १९७६ साली नंदकुमार गोरे यांचा जन्म झाला. 

सुरुवातीचा काळ होता अतिशय संघर्षाचा..!

प्रारंभिक काळामध्ये गावामध्ये गुरे राखणे, संध्याकाळच्या जेवणासाठी दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जाणे अशी कामे करत दिवस पुढे नेले. मात्र दरम्यानच्या काळात अफाट मेहनत, प्रचंड कष्ट, जिद्दीच्या जोरावर, आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत श्री. गोरे यांनी यशाला गवसणी घातली.

आदरणीय भाईंचा परिसस्पर्श झाला अन् माझे जीवन सार्थक झाले!

सन २००२ साली मी मुंबई नगरीत आदरणीय श्री. बापूसाहेब वांगडे (भाई) यांच्या सहवासात आलो. माझ्या जीवनात आलेल्या या आदर्श व्यक्तीच्या येण्याने, असण्याने, त्यांच्या सहवासाने पुढील काळात माझं सोनं होऊन गेलं. शिष्याला योग्य गुरू भेटला, अन् मी माझ्या उद्योग- वाहतूक क्षेत्रात सोन्यासारखा चमकलो. माझ्या आयुष्यात संकटकाळी, निराशेच्या अवस्थेत आदरणीय भाईंनी मला योग्य सल्ला देऊन, योग्य दिशा दाखवून माझं सोनं केलं. दरम्यानच्या काळात जेव्हा मी काही समस्यांना घेऊन चाचपडत होतो, तेव्हा त्यांचे अनुभवी मार्गदर्शन, योग्य सल्ला हा माझ्या यशस्वी वाटचालीकडे नेणारी पहिली पायरी ठरली. त्यामुळे येणाऱ्या संकटाने

मला लोखंडासारखं कणखर व कठीण बनवलं, असे परिसासमान थोर व्यक्तिमत्व भेटल्याने माझ्या जीवनाचं सोनं होऊन गेलं.

मुंबई मायानगरीमध्ये भूषवली विविध पदे

एका डोंगराळ खेड्यातल्या शेतकऱ्याचं पोरगं ते महाराष्ट्र वाहतूक सेनेचे दक्षिण मुंबई चे अध्यक्ष, मुंबई टेम्पो संघटनेचे अध्यक्ष, सह्याद्री धनगर विकास महासंघाचे अध्यक्ष, शिवसह्याद्री पतपेढीचे संचालक अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडून श्री. गोरे यांनी आपल्या नेतृत्वाचा आगळावेगळा आदर्श वस्तुपाठ तयार केला. 

२ रुपये पगारावर (रोजावर) काम केले.

सन १९९० च्या दरम्यान मी पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून मुंबईला जायचा निर्णय घेतला. मुंबई नगरीत गेल्यावर राहण्याची व जेवणाची व्यवस्था होत नव्हती. मग मालचौंडी (ता. जावळी) येथील श्री. भोसले नामक व्यक्तीच्या हॉटेलमध्ये २ रुपये रोजावर काम करू लागलो. पुढे पै-पै जमा करू लागलो. दरम्यानच्या काळात वसई, विरार, भाईंदर, नागवेली, कांदिवली या ठिकाणी मिळेल ते काम करत १९९९ साली पहिली गाडी (लक्ष्मी) घेतली. पुढे अलंकार सिनेमागृहाजवळ सर्व समाज बांधवांसोबत राहिल्यामुळे मोठमोठ्या व्यापाऱ्यांशी ओळखी वाढू लागल्या. त्यानंतर मी कष्ट करत करत दुसऱ्या दोन गाड्या घेतल्या. पुढे प्रचंड कष्ट, अपार मेहनत, खडतर परिस्थितीवर मात करत एक-एक गाडी घेत गेलो अर्थातच वाढवत गेलो. 

आज मुंबई मधील माझा वाहतूक व्यवसाय सुरळीत सुरू आहे. सर्व चालक अत्यंत तळमळीने वाहने सांभाळत व्यवसाय वृद्धी करत आहेत. 

आम्ही आज गावी देखील अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे पर्यटकांना अर्थातच सह्याद्री फिरायला येणाऱ्या पाहुण्यांना सेवेची संधी निर्माण करून दिली आहे. 

आज “जय मल्हार” या पुष्पकाच्या साथीने स्वप्नपूर्तीचे पहिले वर्ष उजाडले मात्र त्यामागे गेल्या कित्येक वर्षांच्या संघर्षाचा काळ होता. तो संघर्ष होता निसर्गाशी, भांडवलाशी, प्रस्थापितांशी अन् हितचिंतकांशी. मात्र आता या संघर्षाला पूर्णविराम मिळतोय..

जागतिक वारसास्थळ कास पठारच्या मुशीत अन् एकीव च्या कुशीत ओसाड माळरानावर लावलेल्या “जय मल्हार” या पुष्पकाला फुलवण्यासाठी, बहरवण्यासाठी मी आज लढतोय, झगडतोय,1 प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय..त्यात अनेकांचे सहकार्य लाभतेय..आपले ही सहकार्य मिळेल, अशी आशा व्यक्त करतो.

आज पर्यंतच्या या जिद्दी प्रवासात साथ देणाऱ्या आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार! 

आपला सहकारी

श्री. नंदकुमार धोंडीबा गोरे (नंदूशेठ)

शब्दांकन: संतोष गोरे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket