प्रज्ञाशोध व N. N. M. S परिक्षेत माचुतर शाळेचे सुयश
महाबळेश्वर -गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली पंचायत समिती महाबळेश्वरच्यावतीने घेण्यात आलेल्या सातवी प्रज्ञाशोध परिक्षेचा निकाल महाराष्ट्र दिनी जाहिर करण्यात आला. शिष्यवृत्ती परिक्षेची पूर्वतयारी होवून शाळांची गुणवत्ता वाढावी या हेतूने परिक्षा घेण्यात आलेल्या सदर परिक्षेत सुयश मिळवत जिल्हा परिषद केंद्रशाळा माचुतरच्या पाच विद्यार्थीनींनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. गौरी संतोष शिंदे, दिव्या प्रकाश शेडगे, माया मारुती हिरवे, प्रेरणा विठ्ठल केळगण्, ईश्वरी अनिल जाधव या विद्यार्थिनींची यात निवड झाली.या विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षक सौ. सुजाता ढेबे व श्री. संजय सोंडकर , श्रीम.अनिसा वारुणकर श्री.एकनाथ जावळे यांचा गुणगौरव मा.गटविकास अधिकारी मा.अरुण मरभळ, गटशिक्षणाधिकारी श्री. आनंद पळसे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आठवी N. N. M. S. परिक्षेत सिद्धेश संतोष जाधव हा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाल्याबद्दल त्याचाही गौरव करण्यात आला. केंद्रस्तरीय प्रज्ञाशोध परिक्षेत आदिती अनिल जंगम, सेजल शंकर शिंदे व रेणुका आनंदा जाधव यांनी प्रथम , द्वितीय, व तृतीय क्रमांक पटकावून यश मिळवले. सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे माचुतरचे सरपंच श्री.सुरेश शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सचिन शिंदे , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य माचुतर तसेच माचुतर व परिसरातील ग्रामस्थांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.शाळेची गुणवत्तेची निर्माण केलेली परंपरा यापुढे अधिक जोमाने वाढवण्याचा विश्वास मुख्याध्यापक श्री.एल.डी.जाधव तसेच श्री.संतोष चोरगे, श्री.विपुल धोडी या मार्गदर्शक शिक्षकांनी व्यक्त केला.