Follow us

Home » ठळक बातम्या » टेस्ट ङ्राईव्ह साठी निघालेला टाटा योध्दा मिनी टेम्पो दरीत कोसळला

टेस्ट ङ्राईव्ह साठी निघालेला टाटा योध्दा मिनी टेम्पो दरीत कोसळला

टेस्ट ङ्राईव्ह साठी निघालेला टाटा योध्दा मिनी टेम्पो दरीत कोसळला

चारजण जखमी

महाबळेश्वर दि :25 प्रतिनिधी महाबळेश्वर पासुन 6 कि मी अंतरावर मेटतळे गावच्या हद्दीत अंबेनळी घाटात टेस्ट ड्राईव्ह साठी निघालेल्या तीन टाटा योध्दा मिनी टेम्पो पौकी एक टेम्पो चालकाचा वाहना वरील ताबा सुटून तो टेम्पो सुरक्षा कठडा तोडुन तीनशे फुट दरीत कोसळला या अपघातात टेम्पोचा चक्काचुर झाला असला तरी या टेम्पोमधील चालक व एक इंजिनियर हे सुदैवाने बालबाल बचावले हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांना वाचविण्यासाठी दरीत उतरलेल्या दोघांसह या अपघातात चौघ जखमी झाले आहेत अपघाताची माहीती मिळताच घटना स्थळी तहसिलदार तेजस्विनी पाटील यांनी धाव घेतली अपघाता मुळे अंबेनळी घाटातील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.

       या अपघातात टेम्पो चालक देवदत्त वाघ रा जळगाव सध्या राहणार पुणे , इंजिनियर जितेंद्र खाणे रा पुणे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत या दोघांना वाचविण्यासाठी दरीत उतरलेले सिताराम शिंगरे व सोमनाथ वागदरे हे दोन स्थानिक युवक जखमी झाले आहेत या सर्वांना प्रथम येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

        पुणे येथील टाटा मोटार च्या तीन योध्दा टेम्पो हे घाटातील टेस्ट ड्राईव्ह साठी पुणे ते पोलादपुर प्रवासाला निघाले होते पुण्यातील कात्रज खंडाळा येथील खंबाटकी तर वाई येथील पसरणी घाट यशस्वी पार करून हे तीन टेम्पो महाबळेश्वर मार्गे अंबेनळी घाटातुन पोलादपुरला निघाले होते. एकत्र प्रवासाला निघालेल्या प्रत्येक टेम्पोत चालक व एक इंजिनियर होते. आज दुपारी बाराच्या दरम्यान या तीन टेम्पो पैकी मधील एका टेम्पो चालकाचा वाहना वरील ताबा सुटल्याने तो टेम्पो सुरक्षा कठडा तोडुन तीनशे फुट खोल दरीत कोसळला सोबत असलेल्या दोन टेम्पो मधील लोकांनी अपघाताची खबर मेटतळे गावातील लोकांना दिली. मेटतळे गावातील काही तरुणांनी अपघात स्थळी धाव घेतली.त्या पैकी काही युवक हे दरीत उतरले दरम्यान या अपघाताची खबर महाबळेश्वर शहरात पसरली अपघाताची माहीती मिळताच येथील महाबळेश्वर ट्रेकर्स, सहयाद्रि ट्रेकर्स,प्रतापगङ ट्रेकर्स च्या जवानांनी बचाव कार्यासाठी अपघात स्थळी धाव घेतली. टेकर्सच्या मागोमाग स्थानिक पोलिसांचे एक पथक देखिल पोहचले तहसिलदार तेजस्विनी खोचरे पाटील या देखिल अपघात स्थळी पोहचल्या त्या पाठोपाठ उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब बालचिम हे देखिल पोलिसांची कुमक घेवन घटना स्थळी घावुन आले. 

        मेटतळे येथील स्थानिक तरूण जेव्हा दरीत उतरले तेव्हा टेम्पो मधील इंजिनियर हे टेम्पो मधुन उडी मारल्याने दरीत 100 फुट अंतरावर आढळुन आले त्यांना काही युवकांनी वर काढण्याचे प्रयत्न सुरू केले तर काही युवक हे 300 फुट खोल दरीत कोसळलेल्या टेम्पो जवळ पोहचले त्या वेळी टेम्पोत अडकलेला चालक हा वाचवा वाचवा असा ओरडत होता काही यवुक हे टेम्पोवर चढले व हात देवुन त्याला चक्काचुर झालेल्या टेम्पो मधुन बाहेर काढत असताना पुन्हा टेम्पोने दोन पटली मारल्या व दरीत खोल कोसळला या वेळी जखमी चालकाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असलेले दोन युवक यात जखमी झाले. 

        अपघातात जखमी झालेल्या चारही जणांना उपचारासाठी येथिल ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात बचाव कार्यासाठी मेटतळे येथील वामन संजय धामुणसे शशी शिंगरे बाळु शिंगरे ,गौरव शिंगरे यांच्या सह महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनिलबाबा भाटीया यांच्या नेतृत्वाखाली अमित कोळी, सुनिल केळगणे निलेश बावळेकर अक्षय नाविलकर अमित झाडे सुमित कोळी सुनिल वाडकर सुरेश वाशिवले ओकार नाविलकर सनी बावळेकर प्रतापगङ ट्रेकर्सचे अनिकेत वागदरे,संकेत सावंत,राजेश सोंङकेर त्याच प्रमाणे सहयाद्रि टे्कर्सचे संजय पार्टे यांनी सहभाग घेतला तर पोलिस विभागाचे वतीने सहा पोलिस निरीक्षक रौफ इनामदार नवनाथ शिंदे अजित पवार ठोंबरे आदी पोलिस कर्मचारी देखिल या वेळी बचाव कार्यात सहभागी झाले होते. 

 

 बचाव कार्याला मदत व्हावी म्हणुन तहसिलदार तेजस्विनी खोचरे पाटील या स्वतः तीन तास घटनास्थळी उपस्थित होत्या त्यांनी अपघातातील जखमींच्या मदतीसाठी रूग्णवाहीका व वैदयकिय पथकासाठी प्रयत्न केले. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पोलादपुर येथील रूग्णवाहीका घटना स्थळी पोहचल्या परंतु स्थानिक महाबळेश्वर येथील ग्रामिण रूग्णालयातील एक ही रूग्णवाहीका तर आली नाहीच परंतु वैदयकिय पथक देखिल घटना स्थळी पोहचले नाही या बाबत तहसिलिदार पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर उपविभागीय अधिकारी यांनी देखील पोलिस विभागाच्या वतीने ग्रामिण रूग्णालय चालविण्यासाठी घेतलेल्या बेल ऐअर विरोधात तक्रार करणार असल्याचे सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket