अंबानी कुटुंबाकडून लालबागच्या राजाला २० किलो वजनाचा सोन्याचा मुकूट अर्पण
मुंबई -अनंत अंबानी, रिलायन्स फाऊंडेशनने लालबागच्या राजाला हा सोनेरी मुकूट दिला.लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी अनेक सेलिब्रिटी देखिल येत असतात. अनंत अंबानी यांची लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारी मंडळात मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लालबागच्या राजा मंडळाचे यंदा 91 वे वर्ष आहे. लालबागच्या राजाने परिधान केलेला सोन्याचा मुकूट हा अंबानी कुटुंबाकडून देण्यात आला असून हा मुकूट 20 किलोचा असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील सर्वात प्रसिद्ध लालबागचा राजाला पाहण्यासाठी गर्दी होत असते. या वर्षीच्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे. राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो लोक रांगा लावतात. आता या वर्षाच्या राजाची पहिली झलक भक्तांना पाहायला मिळाली.