Follow us

Home » ठळक बातम्या » लिंबखिंङ येथील दुभाजकातील सुशोभित फुलझाडे छाटली.. निसर्गप्रेमी कडून संताप ध्वनी वायु प्रदूषणाचा धोका वाढला 

लिंबखिंङ येथील दुभाजकातील सुशोभित फुलझाडे छाटली.. निसर्गप्रेमी कडून संताप ध्वनी वायु प्रदूषणाचा धोका वाढला 

लिंबखिंङ येथील दुभाजकातील सुशोभित फुलझाडे छाटली.. निसर्गप्रेमी कडून संताप ध्वनी वायु प्रदूषणाचा धोका वाढला

लिंब— रखरखत्या उन्हामध्ये ही मनाला व नेत्रांना अल्हादायक व प्रफुल्लित करणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील लिंबखिंडीतील दुभाजकामधील बहरलेल्या रंगीबेरंगी फुलझाडांवर प्रहार करीत ती छाटल्याने निसर्गप्रेमीतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुभाजकात बहरलेली ही फुलझाडे या मार्गाची निसर्गशोभा वाढवीत होती येथील रंगीबेरंगी फुलांमधील भ्रमराचा वाढता वावर पाहून निसर्गप्रेमी सुखवत होते .निसर्ग आणि मानवी जीवनाची अतूट नाते व ऋणानुबंधाच्या एक धागा विणला जात होता अशा नयनरम्य बहरलेल्या दुभाजकातील फुल झाडांवर रस्ते वाहतूक विभागाने प्रहार करून निसर्गप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत बहलेल्या फुल झाडांचा हा परिसर क्षणात विद्रूप व भकास झाला आहे .हिरवेगार झाडांवर फुललेली फुले आता दुभाजकात

कोमजून गेली आहेत निसर्गद्रोह करणाऱ्या या वृत्तीचा निसर्गप्रेमीकङून निषेधच व्यक्त होत आहे.

लिंबखिंड (सातारा )या परिसरातून लाखो प्रवासी व वाहन चालक प्रवास करताना बहरलेली रंगीबेरंगी फुलझाडे पाहून त्यांच्या मनाला खूप प्रसन्न वाटत होते सुखकर प्रवासाचा आनंद फुलांकडे पाहून घेता येत होता दुभाजकातील फुलझाडे तोडल्याने निसर्गप्रेमींच्या मनाला खूप यातना व दुःख होत आहे

श्रीरंग काटेकर सातारा

( निसर्गप्रेमी )

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket