Follow us

Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार” ने पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचा गौरव

सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार” ने पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचा गौरव

सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार” ने पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचा गौरव

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे आदरनीय कुलगुरु महोदय मा.डॉ. प्रशांतकुमार पाटील साहेब यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावला दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (डीएसटीए), पुणे यांचेकडून २०२४ वर्षातील प्रतिष्ठित “सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र” पुरस्काराने ६९ व्या डीएसटीएच्या वार्षिक अधिवेशन व तंत्रज्ञान परिषदेच्या उद्घाटन सत्रादरम्यान प्रदान करुन गौरविण्यात आले. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने केलेल्या संशोधनातील भरीव योगदानामुळे या पारितोषिकासाठी पाडेगाव केंद्राची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र हा ऊस संशोधनातील उत्कृष्ट योगदानासाठी दिले जाणारे मानाचे पारितोषिक आहे. या पारितोषिकामुळे ऊस विकास व संशोधनातील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव केंद्राचे योगदान महाराष्ट्र राज्यात पुन्हा दिसुन आले आहे.

वार्षिक अधिवेशन आणि शुगर एक्सोपोच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसुल, दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री, आदरणीय ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सहकार मंत्री व राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष मा. नामदार श्री. हर्षवर्धन पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त मा.डॉ. कुणाल खेमनार सर, रेना सहकारी साखर कारखन्याचे अध्यक्ष मा. दिलीपरावजी देशमुख साहेब आणि डीएसटीए चे अध्यक्ष मा.श्री. शहाजी भड साहेब यांची विशेष उपस्थिती होती. उद्घाटन सत्रानंतर मा. अध्यक्षांनी दुरदृष्य प्रणालिद्वारे आपल्या भाषणातुन साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचे आव्हान आहे, त्यासाठी या क्षेत्रात काम करणा-या संस्थानी संशोधन आणि तंत्रज्ञान विकास करण्यासाठी काम करावे असे आवाहन केले.

पाडेगाव संशोधन केंद्राच्या आजपर्यंतच्या संशोधनातील भरीव योगदानाबद्दल दि.२४ व २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ६९ व्या वार्षिक अधिवेशन व तंत्रज्ञान परिषद २०२४ मध्ये मध्यवर्ती संशोधन केंद्रास “सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार” माजी सहकार मंत्री व राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री. हर्षवर्धन पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त मा.डॉ. कुणाल खेमनार सर, रेना सहकारी साखर कारखन्याचे अध्यक्ष मा. दिलीपरावजी देशमुख साहेब आणि डीएसटीए चे अध्यक्ष मा.श्री. शहाजी भड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाडेगाव संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ मा.डॉ. राजेंद्र भिलारे, ऊस रोगशास्त्रज्ञ डॉ. सुरज नलावडे, शरीरक्रियाशास्त्रज्ञ डॉ. कैलास भोईटे, ऊस पैदासकार डॉ. सुरेश उबाळे, ऊस बेणे विक्री अधिकारी डॉ. दत्तात्रय थोरवे, कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. किरण ओंबासे व डॉ. माधवी शेळके यांनी स्विकारला. सदर परिषदेत डॉ. सुरज नलावडे, ऊस रोगशास्त्र यांना “उत्कृष्ट शोध निबंध सादरीकरण पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले.

महाराष्ट्रातील अनेक सहकारी व खाजगी कारखान्यांच्या कार्यकारी संचालक आणि ऊस विकास अधिकारी यांनी पाडेगाव संशोधन केंद्राच्या योगदानाला हा पुरस्कार जाहीर झाल्याने आंनद व्यक्त करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मा. कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी संशोधन केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा मनोदय व्यक्त केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू 

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू  खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर

Live Cricket