Follow us

Home » ठळक बातम्या » वाईत मुख्याधिकाऱ्यांची धाडसी कारवाई .थकीत घरपट्टी साठी स्टेट बॅंकेची इमारत केली सील 

वाईत मुख्याधिकाऱ्यांची धाडसी कारवाई .थकीत घरपट्टी साठी स्टेट बॅंकेची इमारत केली सील 

वाईत मुख्याधिकाऱ्यांची धाडसी कारवाई .थकीत घरपट्टी साठी स्टेट बॅंकेची इमारत केली सील कौतुकांचा वर्षाव

वाई प्रतिनिधी :वाई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सजीवनी दळवी यांच्या मार्गदर्शना खाली घरपट्टी वसुली पथकाचे प्रमुख करनिरीक्षक बाळासाहेब कांबळे मालमत्ता पर्यवेक्षक मनोज बारटक्के आणी कर्मचारी यांनी एकत्रित येवुन हे पथक वसुलीसाठी वाई शहरात असणाऱ्या स्टेट बॅंकेच्या कार्यालयात गेले आणी तेथे उपस्थित असलेल्या शाखा प्रमुखांना थकीत घरपट्टी भरण्या साठी आग्रह केला पण या वसुली पथकाला बॅंक मॅनेजरने उडवा उडवीची ऊत्तरे दिल्याने वसुली पथक संतापले आणी काही क्षणातच बॅंकेत आलेल्या ग्राहकांना व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून शटर बंद करुन थेट आख्या स्टेट बॅंकेच्या कार्यालयाची इमारतच सील करुन टाकली त्या मुळे बॅंकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद झाले . पथकाच्या या धाडसी कारवाई मुळे वाई शहर हादरुन गेले आहे .पथकाच्या या धाडसी कारवाईचे वाई शहरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे .

वाई पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घरपट्टी वसुली पथकाने वाई शहरात आता घरपट्टी वसुलीचा निपक्षपाती धडाका सुरु केल्याने शहरातील थकबाकीदार गाळेमालकांन सह घरमालक चांगलेच हादरले आहेत . स्टेट बॅंकेच्या इमारतीच्या करार नाम्याची मुदत दिनांक ३१/०३/२०२० रोजी संपलेली असून सदर इमारतीचे सन २०२३-२४ अखेर नगरपरिषदेस येणे असलेली इमारत भाडे रक्कम रुपये २१लाख ६३हजार ९५४ बाकी आहे.वारंवार मागणी करुनही ,पर्यायी जागा देऊनही जागा खाली करण्यास बॅंकेने नकार दिल्याने मंगळवार दि .२८ रोजी सकाळी पालिकेने बँकेची इमारत पोलिस बंदोबस्तात सील केली .त्यामुळे सातारा पुणे येथील बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यान मध्ये एकच खळबळ उडाली होती .या कारवाई दरम्यान वाई तालुक्यातील ग्राहकांची व्यवहारा अभावी मोठी कुचंबणा झाल्याचे दिसून येत होते .

शहरातील भाजी मंडईतील आणखी थकबाकीदार जागा व गाळे मालकांचे गाळे देखील सील करणार असल्याचे मुख्याधिकारी संजीवनी दळवी व कर निरीक्षक बाळासाहेब कांबळे व मालमत्ता पर्यवेक्षक मनोज बारटक्के यांनी सांगितले .स्टेट बॅंकेची हि इमारत गेल्या अनेक वर्षांपासून धोका दायक परस्थीतीत ऊभी आहे ती कुठल्याही क्षणी आपोआप जमीनदोस्त होवुन त्यात अनेकांना आपल्या प्राणांना मुकावे लागणार आहे अशा प्रकारच्या लेखी नोटीसा अनेकदा बॅंकेला देवुन देखील बॅंक पर्यायी जागेचा शोध घेवुन स्थलांतरीत होत नसल्याचे मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी गंभीर दखल घेवुनच हि धाडसी कारवाई केली आहे . १५ जुन पर्यंत बॅंकेने स्व इच्छेने हि जागा सोडली नाही तर बॅंकेवर नगर परिषदे मार्फत फौजदारी गुन्हा दाखल करुन पोलिस बंदोबस्तात ती धोकादायक इमारत जेसीबीच्या साह्याने पाडणार आहे असा इशाराही मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी बॅंकेच्या वरिष्ठ अधिकार्यांना लेखी पत्रा व्दारे दिला आहे .या धाडसी कारवाईचे वाई शहरातील नागरिकांनी कौतुक केले आहे .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन 

एसटी महामंडळाकडून चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन  महाबळेश्वर 19 जून: राज्य परिवहन महामंडळाच्या महाबळेश्वर आगाराने आज मेट गुताड

Live Cricket