Follow us

Home » राज्य » शिक्षण » वस्तीगृहातील संस्कारातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचवितो – साहित्यिक प्रा.श्रीधर सांळुखे

वस्तीगृहातील संस्कारातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचवितो – साहित्यिक प्रा.श्रीधर सांळुखे

वस्तीगृहातील संस्कारातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचवितो – साहित्यिक प्रा.श्रीधर सांळुखे

देगाव : जीवनात कितीही बिकट परिस्थिती असू दे त्यावर जिद्दीने मात करण्याचे खरे सामर्थ्य वस्तीगृहातील संस्कारामधून प्राप्त होते असे मत साहित्यिक व व्याख्याते प्रा श्रीधर सांळुखे यानी व्यक्त केले ते देगाव ता.जि सातारा येथील, गौरीशंकरचे सातारा कॉलेज आँफ फार्मसी देगाव येथील वस्तीगृहात राहणार्‍या विद्यार्थ्याच्या निरोप समारंभ प्रसंगी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी संस्थेचे संचालक डॉ अनिरुध्द जगताप, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ नागेश अलूरकर, प्रबंधक हेमत काळे वस्तीगृह अधिक्षक प्रमुख सुरज महाडिक विक्रम शिंदे अदि प्रमुख उपस्थित होते.

प्रा श्रीधर सांळुखे पुढे म्हणाले कि वस्तीगृहातील भोजन उत्तम असेल तर विद्यार्थ्यांची शारीरिक मानसिक स्थिती उत्तम राहून त्यांची सवर्गिण प्रगती घडते असे मत व्यक्त करून ते पुढे म्हणाले कि आपुलकी जिव्हाळा व ऋणानुबंधाचे नाते हे खर्‍या अर्थाने वस्तीगृहाच्या सानिध्यात अनुभवला मिळते. जिथे जिव्हाळा तेथेच आपुलकीचा धागा विणला जातो. 

डॉ अनिरुध्द जगताप पुढे म्हणाले कि संघिक व एकात्मतेची भावनाचे खरे प्रतिक हे वस्तीगृहात अनुभवला मिळते. उत्तम भोजन देणार्‍या वस्तीगृह विषयी विद्यार्थ्यांना नेहमीच आपुलकी वाटते.

जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले कि सेवा, संस्काराचे मूळ हे अंतरमनात सामविलेले असते विद्यार्थ्याना जे आपुलकीने उत्तम सोयी सुविधा देतात त्याच्याबाबत नेहमीच आदर निर्माण होतो.

प्रारंभी वस्तीगृहातील विद्यार्थ्यानी कला क्रिडा- क्षेत्राबरोबरच नाईपर जे.ई.ई परिक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्याचा प्रा. श्रीधर सांळुखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच वस्तीगृ‌हातील विद्यार्थीनासाठी भोजन बनविणार्‍या माहीला वर्ग यांना पैठणी साठी भेट देवून त्याचा उचित सन्मान करण्यात आला तसेच पुरुष वर्गाचा ही शाल श्रीफळ बुके देवून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सुरज महाडिक यांनी केले

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार

कराड, मलकापूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुढाकार  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Live Cricket