Follow us

Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पृथ्वीवरील स्वर्ग कासवर ५ सप्टेंबर पासून खुलणार फुलांची पहाट फुलोत्सोवासाठी समिती आणि वनविभाग सज्ज 

पृथ्वीवरील स्वर्ग कासवर ५ सप्टेंबर पासून खुलणार फुलांची पहाट फुलोत्सोवासाठी समिती आणि वनविभाग सज्ज 

पृथ्वीवरील स्वर्ग कासवर ५ सप्टेंबर पासून खुलणार फुलांची पहाट फुलोत्सोवासाठी समिती आणि वनविभाग सज्ज 

सातारा : पृथ्वीवरील स्वर्ग समजल्या जाणाऱ्या आणि जागतिक वारसा स्थळ असलेल्या वर्ल्ड हेरिटेज  कास पुष्प पठारावरील फुलांची पर्वणी पर्यटकांसाठी ५ सप्टेंबर पासून खुली करण्यात येणार असून कास पठार कार्यकारी समिती आणि वनविभागा कडून यावर्षीच्या कास हंगामाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. 

5 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक अकरा वाजता लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सातारा जावलीचे कार्यसम्राट आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये यावर्षीच्या कास फुलोत्सवाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

यावेळी सातारा उपवनसंरक्षक यांचेसह सातारा व जावली च वनपरिक्षेत्र अधिकारी व कास पठार कार्यकारी समितीचे सर्व सदस्य व कर्मचारी देखील उपस्थित राहणार आहेत. कास पठार कार्यकारी समितीकडून पर्यटकांसाठीच्या सर्व सोयी सुविधांची तयारी करण्यात आली असून यावर्षी प्रथमच  पर्यटकांच्या करिता पाऊस आणि उन्हापासून संरक्षणासाठी  नैसर्गिक रित्या सहा निवारा शेड तयार करण्यात आले  आहेत . कास हंगाम जरी पाच तारखेला अधिकृत खुला केला तरी दहा तारखे नंतर ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना ऑनलाइन ची सुविधा www.kas.ind.in या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क १५० रुपये, गाईड फी  शंभर रुपये ( प्रति ग्रुप १० पर्यटक संख्या), उपद्रव शुल्क दोन हजार रुपये, बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना 40 रुपये प्रवेश शुल्क मात्र सोमवार ते शुक्रवार येणे बंधनकारक असेल तसेच संबंधित शाळा कॉलेज महाविद्यालय यांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांचे पत्र आवश्यक असेल. हंगामा करिता सहा गावातील १३० हंगामी स्वयंसेवकांची  नियुक्ती करण्यात आलेली आहे. पार्किंग ते कास पुष्प पठार यादरम्यान पर्यटकांसाठी मोफत बस सेवा पुरविली जाणार आहे तसेच पार्किंग मध्ये सहा शौचालयांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.

तसेच ठीक ठिकाणी पिण्यासाठी मिनरल वॉटर चे पाणी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कास पुष्प पठारावर सद्यस्थितीमध्ये चवर,टोपली कारवी, दिपकांडी,आभाळी, सीतेची आसवे, सोनकी,तेरडा, भारांगी,धनगरी फेटा,तुतारी,कुमुदिनी यासह अनेक प्रकारची फुले उमलेली असून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये नैसर्गिक मध्ये ज्या प्रकारे बदल होतात त्याप्रमाणे इतर देखील फुले पर्यटकांना वेगवेगळ्या टप्प्यात पाहता येणार आहेत त्यामुळे यावर्षींच्या कासच्या फुलोत्सवाची परवणी आता पर्यटकांसाठी खुली होणार आहे.

कास पुष्प पठारावर यावर्षी प्रथमच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवण्यात येणार असून कास पठार कार्यकारी समितीचे कार्यालय तसेच राजमार्ग  मुख्य प्रवेशद्वार ज्या ठिकाणी प्रवेश शुल्क घेतले जाते या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे हंगामापूर्वी बसविण्यात येणार आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू 

खंडाळ्यात पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात उड्डाण पुलावरून कोसळले पतीचा मृत्यू  खंडाळा प्रतिनिधी :पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर

Live Cricket