Follow us

Home » राजकारण » बहुजन मुक्ती पार्टी चे अधिकृत उमेदवार मा.तुषार विजय मोतलिंग यांचा जाहीरनामा प्रसिद्ध

बहुजन मुक्ती पार्टी चे अधिकृत उमेदवार मा.तुषार विजय मोतलिंग यांचा जाहीरनामा प्रसिद्ध

बहुजन मुक्ती पार्टी चे अधिकृत उमेदवार मा.तुषार विजय मोतलिंग यांचा जाहीरनामा प्रसिद्ध

कळंभे, तालुका वाई  गावातील ग्रामस्थ  सोबत ४५ सातारा लोकसभा मतदार संघ बहुजन मुक्ती पार्टी चे अधिकृत उमेदवार मा.तुषार विजय मोतलिंग यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सर्वांनी मोठ्या प्रमाणत ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. कळंभे गावातील ग्रामस्थांनी एवढ्या मोठ्या प्रमाणत स्वागत करून सन्मान दिला.

जाहीरनाम्यातील काही मुद्दे

■ शेतक-यांच्या मालासाठी स्वामीनाथन आयोगानुसार हमीभाव मिळवून देणार ■ मराठा आरक्षणासाठी अडचणीची ५०% ची अट कलम ३६८ नुसार उठवणार

■ ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करणार

■ मुदत संपलेला आनेवाडी टोल नाका कायमचा बंद करणार

■ सातारा जिल्ह्यातील प्रश्न संसदेत मांडण्यासाठी लोकसभा सभागृहात १००% उपस्थित राहणार

■ सातारा जिल्ह्यातील मुला मुलींना UPSC, MPSC तसेच इतर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टडी सेंटर उभारणार

■ सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई या तालुक्यातील डोंगरी भागासाठी आवश्यक तिथे २४ तास चालणारे सुसज्ज हॉस्पिटल सुरु करणार

■ सातारा जिल्ह्यातील धरणांचे पाणी जिल्ह्याची तहान भागल्यानंतरच बाहेर जाऊ देणार

■ जिल्ह्यातील गडकिल्यांचे संवर्धनासाठी संसदेत आवाज उठवून भरघोस निधी मंजूर करणार

■ जिल्ह्यातील सुशिक्षत युवकांना शासनाच्या किमान वेतन क्षेणीने प्रतिवर्ष किमान ५००० नोकन्या मिळवून देणार

■ सरकारी कंपन्यांचे विकून खाजगीकरण केल्याने OBC, SC, ST समाजाच्या हक्काच्या नोकन्या गेल्या, पुन्हा त्याच कंपन्या शासकीय करून लाखो नोकऱ्या उपलब्ध करणार

■ अल्पसंख्यांक समाज रक्षणासाठी संसदेत कायदा बनवण्यासाठी मागणी करणार

■ वडार समाजाचा हक्काचा खाण व्यवसायाला कायदेशीर स्वरूप देऊन या व्यवसायात वडार समाजाला प्रथम प्राधान्य देण्यासाठी संसदेत प्रयत्न करणार

सातारा जिल्हा परिषद मधील बेकायदेशीर कामांबाबत संसदेत आवाज उठवणार (उदा. अनुसुचित जातीच्या नोकन्या व निधींचा गैरवापर, भरती घोटाळा, औषध घोटाळा)

• ■ लोकशाही मजबुत करण्यासाठी व निवडणूक प्रक्रिया मुक्त, निःपक्ष व पारदर्शक होण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा कायदा संसदेत पास करण्यासाठी प्रयत्न करणार.

■ भटके विमुक्त (NT,DNT,VJNT) या समुहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र “भटके-विमुक्त मंत्रालय” स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार.

॥ समाजातील सर्व घटकातील मुला-मुलींचे प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणार

■ जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देऊन यामध्ये स्थानिक लोकांना प्राधान्य देऊन रोजगार उपलब्ध करणार

■ जिल्ह्यातील बंद पडलेल्या एम.आय.डी.सी. व त्यामधील कंपन्यांना संरक्षण देवून औद्यागिक विकासाला चालना देणार. केडांबे येथे भव्य चिरंतन स्मारक उभारणार ॥ २६/११ मुंबई हाल्यातील शहीद तुकाराम ओंबळे यांचे त्याच्या जन्मगावी केडांबे

स्थानिक राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे रखडलेला हुमगांव-बावधन रस्ता (चिंचखिंड मार्गे) तयार करणार

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक

उंब्रज तालुका कराड  येथे नाल्यामध्ये सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक उंब्रज प्रतिनधी:- उंब्रज तालुका कराड येथे ग्रामपंचायत समोरील नाल्यामध्ये स्त्री

Live Cricket